अमृता फडणवीसांचं व्हॅलेन्टांईन स्पेशल गाणं बघितलंत का ?

गोमंतक वृत्तसेवा
सोमवार, 15 फेब्रुवारी 2021

' ये नैना डरे डरे हे गाणं' हे व्हॅलेटांइन स्पेशल गाणं सारेगामा ग्लोबलची निर्मिती आहे.

मुबंई : राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांचे व्हॅलेटांइन डे स्पेशल गाणं नुकतच रिलीज झालं आहे. ‘ये नैना डरे डरे’ अंस गाण्याचे बोल आहेत. अमृता फडणवीस यांनी रविवारी या गाण्याची लिंक आपल्या सोशल मिडीया आकाउंट वरुन शेअर केली.

‘’खूप सारी गुलाबांची फूल देत तुमच्यासमोर सादर करत आहे, ये नैना डरे डरे हे गाणं. हे व्हॅलेटांइन स्पेशल गाणं सारेगामा ग्लोबलची निर्मिती आहे. हे गाणं स्पेशल रोमॅन्टीक गाणं असून या गाण्यामध्ये मी स्व:ताची व्हॅलेटाइंन असल्यासारंख एन्जॉय केला आहे.’’ असं ट्विट करत अमृता फडणवीसांनी हे गाणं शेअर केलं आहे. अमृता यांनी हे गाण लॉंच करण्याआगोदर गाण्यामधील आपले लूकचे फोटो शेअर केले आहेत. ‘’प्रेम हे जादूच्या सर्वात जवळची गोष्ट आहे. आम्ही लवकरच आम्ही तुमच्यासाठी नवीव गाणं घेऊन येत आहोत.'' असं टीझर लॉंच करत असताना आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

अमृता यांच्या नवीन गाण्याला दोनच दिवसातचं 50 हजाराहून अधिक लाइक्स मिळाल्या. तसेच यूट्यूबर या व्हिडीओखाली कमेंट सेक्शनमध्ये अमृता फडणवीस यांना ट्रोलही करण्यात येत आहे. या व्हीडीओवर डिसलाइकचा पर्याय उपलब्ध करुन देण्यात यावा अशी मागणीही करण्य़ात आली. त्याचबरोबर काहींनी या नवीन गाण्य़ाचे कौतुक करत  अमृता यांच्या लूकचीही प्रशंसा केली आहे.  

संबंधित बातम्या