HBD आर. माधवन ''माझ्या सावळ्या रंगामुळे माझे लग्न ...''

गोमंन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 1 जून 2021

झारखंडमधील जमशेदपूरमध्ये 1जून 1970 रोजी त्याचा जन्म झाला.

बॉलिवू़मधील प्रसिध्द अभिनेता आर. माधवन(R. Madhavan) आज त्याचा वाढदिवस साजरा करत आहे. बॉलिवूडपासून ते अगदी दाक्षिणात्य सिनेसृष्टीत त्याने आपल्या अभिनयाच्या जादूनं प्रेक्षकांच्या मनावर भुरळ पाडली. देशभरात माधवनचे अनेक चाहते आहेत. आधीच लाजाळू स्वभाव खूप जास्त असलेल्या माधवनची प्रेमकहाणी खूपच खास आहे. आज त्याच्या वाढदिवसानिमित्त(Birthday)आपण त्याची अफलातून प्रेमकहाणी जाणून घेऊया.

झारखंडमधील जमशेदपूरमध्ये (Jamshedpur) 1जून 1970 रोजी त्याचा जन्म झाला. माधवन अभ्यासात अत्यंत हुशार होता. त्याला सैन्यामध्ये जाण्याची इच्छा होती. मात्र पालकांच्या इच्छेमुळे त्याने कोल्हापुरमधील अभियांत्रिकी कॉलेजमध्ये (College of Engineering Kolhapur) प्रवेश घेतला. शिक्षण सुरु असतानाच माधवनने कम्युनिकेशन आणि पब्लिक स्पिकिंगचा क्लासही घेण्यास सुरुवात केली होती. याचवेळी आर. माधवन आणि  सरिता (Sarita) यांची पहिली भेट झाली होती. (HBD R Madhavan My wedding because of my shadow color) 

5G Technology: जूही चावला भारतातील 5 जी तंत्रज्ञानाविरूद्ध

याचवेळी,सरिताने माधवनच्या क्लासेसमध्ये प्रवेश घेतला होता. त्यानंतर सरिताला एअर हॉस्टेची नोकरीही मिळाली. सरिताने माधवनचे आभार मानण्यासाठी त्याला डिनरसाठी विचारले. मात्र माधवनने त्याच्या लाजाळू स्वभावामुळे सरिताला भेटण्याची संधी सोडली होती. माधवनला त्याच्या सावळ्या रंगामुळे कायम लग्नाची चिंता सतावत होती. कोण आपल्याशी लग्न करणार असा प्रश्न त्याला सतत पडत होता. त्याचवेळी सरिताने त्याला डेटसाठी विचारताच तो लगेच तयार झाला. एका मुलाखती दरम्यान तो म्हणाला, ''माझ्या सावळ्या रंगामुळे माझे लग्न कधी होईल की नाही. सरिता माझी खूप चांगली मैत्रीण होती. त्यामुळे सरिता माझ्यासाठी खूप कष्ट घेत असत. मला त्यावेळी ती खूप चांगली वाटली आणि लगेच तिने डिनरसाठी दिलेला प्रस्ताव मान्य केला.'' टीव्हीवरील मालिका ते सिनेमा असा आर माधवनचा फिल्मी प्रवास देखील खूपच खास आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by R. Madhavan (@actormaddy)

सरिता आणि माधवन यांच्यात पहिल्या डेटनंतर खूप छान मैत्री निर्माण झाली. आणि नंतर त्याचं रुपांतर प्रेमात झालं. सरिता आणि माधवन आठ वर्षे एकमेकांना डेट करत होते. 1991 मध्ये ते दोघे लग्नबेडीत अडकले. अशाप्रकारे माधवनने त्याची विद्यार्थीनीच असणाऱ्या सरिताशी लग्न केले. वेदांत नावाचा माधवन आणि सरिताला मुलगा आहे.

संबंधित बातम्या