एक गरम चाय की प्याली हो; कंगनाने दिल्या फॅन्स ला हेल्थ टिप्स

गोमंन्तक वृत्तसेवा
सोमवार, 3 मे 2021

बॉलिवूडची फेमस अभिनेत्री कंगना रनौत जेवढी बिनधास्त आहे तेवढीच तिच्या आरोग्याबद्दल गंभीर. आजकाल सामाजिक आणि राजकीय मुद्द्यांव्यतिरिक्त ती फिटनेसवरही आपले मत व्यक्त करत आहे.

बॉलिवूडची फेमस अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut )जेवढी बिनधास्त आहे तेवढीच तिच्या आरोग्याबद्दल गंभीर. आजकाल सामाजिक आणि राजकीय मुद्द्यांव्यतिरिक्त ती फिटनेसवरही आपले मत व्यक्त करत आहे. आता तिने एक ट्विट करून आपल्या दिवसाची सुरवात ती कशी करते  हे सांगितले आहे. तसेच तीचा आहार आणि दिनक्रम कसा आहे हे सोशल मिडियाच्या माध्यमातून सांगितले आहे. (Health tips given to fans by Bollywood actress Kangana Ranaut)

पूर्वी कंगनाने असे अनेक ट्वीट केले होते ज्या मुळे ती वादाच्या भोवऱ्यात अडकली होती. मात्र आता तीने आरोग्य आणि खाण्यापिण्याच्या सवयींबाबत एकामागोमाग एक ट्विट शेअर केले आहेत. यामध्ये कंगनाने आपला फिटनेस रूटीन सांगितला आहे. कंगनाने बरेच फोटो सोशल मिडियावर शेअर केले आहेत. त्यापैकी पहिल्या फोटोमध्ये टेबलवर ठेवलेला चहा दिसत आहे. चहासह एका वेगळ्या बाउलमध्ये बदाम आणि किश्मिशचे काही तुकडे ठेवले आहे.

'दिवसभर मी काय खावे आणि काय खावे हे बर्‍याच लोकांना जाणून घ्यायचे आहे. मी आज जे खाते ते सर्वांना सांगायचे आहे. या गोष्टी स्वत: करून पहा. यामुळे तुमची रोग प्रतिकारशक्ती वाढेल की वजन कमी होईल हे तुम्हाला समजेल', असे  कॅप्शन तीने या फोटोला दिले आहे. यानंतर तीनी फळांविषयीही सांगितले. टरबूजच्या तुकड्यांचा फोटो शेअर करत फळं खायला सांगितले आहे.

'मी दिवसाची सुरुवात एक ग्लास पाणी पिवून करते, परंतु कधीकधी जास्त पाणी पिणे देखील शरीरासाठी हानिकारक असते. पाणी पिल्यानंतर मी एक कडक चहा घेते, त्याबरोबरच रात्रभर पाण्यात भिजवलेले बदाम आणि मनुका खाते', अशी माहिती तिने हे फोटो शेअर करतांना दिली आहे,' अशी माहिती तीने दिली आहे. त्यानंतर कंगनाने आणखी एक ट्विट केले ज्यात बंगाल निवडणुकीच्या निकालावरुन निराश असल्याचे तीने सांगितले आहे. त्यानंतर कंगनाने ज्युस पिण्याचे सिक्रेट शेअर केले. 

'मी नारळ पाणी पिण्यासाठी आवर्जून वेळ काढते. आपण किनारपट्टी भागात राहत नसल्यास रोज ताज्या लिंबाचा रस किंवा ताक पिवू शकता. लक्षात ठेवा मी जेव्हा काम करत नाही तेव्हाचा हा माझा आहार आहे. कामाच्या ठिकाणी, मी बहुतेकदा या ज्युससोबत  स्नॅक्स पण खाते,असे तीने सांगितले. त्यानंतर तिने तिचा  कॉफी चा अनूभवही चाहत्यासाठी शेअर केला.

कंगनाने असे बरेच ट्विट शेअर केले आहे. ज्यात तीने हेल्थ जिप्स दिल्या आहेत. बऱ्याच युजर्सनी यावर आपल्या प्रतिक्रियाही व्यक्त केल्या ​​आहेत आणि ते आजपासूनच कंगनाने सांगितलेल्या हेल्थ टिप्स फॉलो करणार असं म्हणत आहे.

लालसिंग चड्ढाच्या चित्रीकरणासाठी आमिर खान लडाखला रवाना; पहा video 
 

संबंधित बातम्या