सिनेमा - एक परिणामकारक माध्यम

entertainment
entertainment

साहित्यिक, कलाकार आणि प्रेक्षकाना देखिल आपली विचारप्रणाली वाढविण्यासाठी हे चित्रपट अत्यंत आवश्यक आहेत. रूठीन विषयापासून दूर नेणाऱ्या या सिनेमांतून नक्कीच आपल्याला नवनवीन वैचारीक दृष्टीकोन मिळत जातात. इतर देशात बऱ्याच क्रांतिकारी विषयांचे मुद्दे घेवून कथानके बनविणारे लेखक आणि कथाकार तसेच त्याना चित्रपटाचे सुंदर रूप देणाऱ्या दिग्दर्शकांचे कसब पाहून आम्ही थक्क होतो. भारतात देखिल असे कितीतरी विषय आम्हाला एकदम हलवून सोडतात. 

सिनेमाचे वेड वेगळेच असते. भूल पाडणारे. दरवर्षी नोव्हेंबर महिन्यात येणारा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव सिने रसिकासाठी एक उत्सवच आहे. सिनेमा हे समाजावर आणि लोकांवर परिणाम साधणारे एक अतिशय प्रभावी माध्यम. आंतरराष्ट्रीय चलचित्र महोत्सवातील सिनेमा बघणे म्हणजे आपले मनोरंजन करणे नव्हे, आणि काही तासांकरिता तो वेळकाडू म्हणजे टायमपासही नव्हे. त्या मानाने गोव्यातील  लेखकांना तसेच सिनेमा अभ्यासकांना हा महोत्सव म्हणजे एक सुवर्णसंधीच ठरली आहे. २००४ वर्षापासून गोवा हे चित्रपट महोत्सवाचे कायम स्वरूपी केंद्र झाले आहे. मध्यंतरीच्या काळात मलाही ही आवड आणि वेड लागलेले. एका महोत्सवात मी दहा बारा सिनेमा बघायची. दुर्मिळ सिनेमा, आगळी वेगळी कथानके. यंदा नाही जमले. पण आधले अनुभव बरेच काही सांगून गेलेत त्यांची उजळणी चालली डोक्यात.

जगातील काना कोपऱ्यातून निवड झालेल्या सिनेमामधले काही सिनेमा बघितल्यावर आपल्या मनाला अस्वस्थता जाणवते आणि केव्हा काही प्रसंग बघून अंगाचा थरकाप होतो. जे विविध संदेश आपल्याला यातून मिळतात त्यातून आजच्या आधुनिक जगात जागृत राहायला मदत होते. माणूस आणि माणसांतर्गत निर्माण झालेली नाती, माणूस आणि त्याच्या भोवतालचा समाज, माणूस आणि निसर्ग, पायाखालची माती आणि हवा. देश तसा वेष, वेगवेगळ्या भाषा, अलग संस्कृती आणि या सर्वातून निर्माण होणाऱ्या चित्र विचित्र कथा. त्या त्या कथेला त्या त्या प्रदेशाची  भौगोलिक आणि ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभून दिग्दर्शकाच्या दृष्टिकोनातून साकारलेले चलचित्र प्रेक्षकांना एक निराळा संदेशही देऊन जाते.

एका वर्षी फिल्म महोत्सवात एक विएतनामी चित्रपट बघितला, ‘फ्लॅपींग इन द मिडल ऑफ नोवेअर’. विएतनामाच्या वातावरणात निर्माण झालेले हे फिल्म  एका तरूण युवतीच्या परिस्थितीवर साकारलेले होते, ज्या मुलीला आपल्या मित्रांपासून दिवस जातात आणि जेव्हा तिला हे कळते तेव्हा ती फार घाबरते. ॲबोर्शन करून घ्यायला तिच्याकडे पैसे नसतात. तिची ती भयांकृत अवस्था! अशा अनेक वास्तव विषयांवरची कथानके महोत्सवातल्या चित्रपटातून पाहायला मिळतात. आपल्या संवेदना जाग्या होतात, आणि वेदनाना वाट मोकळी होते.

साहित्यिक, कलाकार आणि प्रेक्षकाना देखिल आपली विचारप्रणाली वाढविण्यासाठी हे चित्रपट अत्यंत आवश्यक आहेत. रूठीन विषयापासून दूर नेणाऱ्या या सिनेमांतून नक्कीच आपल्याला नवनवीन वैचारीक दृष्टीकोन मिळत जातात. इतर देशात बऱ्याच क्रांतिकारी विषयांचे मुद्दे घेवून कथानके बनविणारे लेखक आणि कथाकार तसेच त्याना चित्रपटाचे सुंदर रूप देणाऱ्या दिग्दर्शकांचे कसब पाहून आम्ही थक्क होतो. भारतात देखिल असे कितीतरी विषय आम्हाला एकदम हलवून सोडतात. त्यांचा पाठपुरावा करून ते सिनेमा पडद्यावर आम्हाला का दिसत नाहीत? बलात्कार, बॉम्ब हल्ले, वेश्याव्यवसाय, ड्रग्स सप्लाय अशा एक ना कितीतरी प्रकरणातून सामाजीक स्वास्थ्याचा बिघाड घडत असतो. हे विषय दुर्लक्षीत होता कामा नये. कारण चित्रपटातून जास्त लवकर प्रभाव पडतो

इराणचे चित्रपट अधिक लोकप्रिय. कारण त्यांची कथानके कुटूंबीक. पुरूषांच्या दडपणाखाली राहिल्याने स्त्रीयांची होणारी घुस्मट, बंड करण्याची त्यांची तळमळ पडद्यावर दिसून येते.  अशाच एका कौटुंबीक पण बंडखोर अशा विषयाच्या इराण देशातील सामाजीक रूढी बंधनात बांधलेल्या एका कथानकाला एका वर्षी सर्वोत्कृष्ट पुरस्काराचा सुवर्ण मयूर प्राप्त झाला. आपल्या मुलीवर आतोनात प्रेम करणारे पुराणमतवादी अर्थात कन्झर्वेटीव्ह वडील आणि त्या प्रेमापोटी मुलीच्या मनात आदराव्यतिरिक्त भिती आणि दरारा निर्माण होवून ती दिवस रात्र घाबरलेल्या अवस्थेत असते.  तो स्वत:ला घराचा हुकूमदार कसा वागतो आणि सगळे निर्णय आपणच घ्यायला पाहिजेत अशी  घरांतल्या माणसांवर त्याची सक्ती असते. पण एक दिवस बंडाचे एक भयानक नाट्य घडते आणि कुटूंबातील रूढी परंपरांची घडी कोलमडते. 15 वर्षांची ती मुलगी आपल्या बापाच्या नकऴत विमानातून तेहरानला जाते. तिथे तिचा एक मित्र असतो आणि तो केनडाला जायचा असतो. तिच्या मैत्रिणी तिथे जमलेल्या असतात. ताबडतोब परतण्याचा तिचा बेत असतो पण खराब हवामानामुळे परतण्याची फ्लायट रद्द होते आणि मग सगळा गोंधळ निर्माण होतो.  बाप तिला शोधण्यासाठी गाडी घेवून येतो आणि मध्ये  

कितीतरी प्रसंग घडत जातात आणि संघर्ष, चिडाचिड यातून इराणमधील सामाजीक परिस्थितीचे दर्शन घडते. पितृसत्ताक कुटूंब आणि पुरूषप्रधान संस्कृती यावर वसलेला इराणी समाज या कथानकातून दर्शकाना दिसून येतो.

आंतरराष्ट्रीय सिनेमांतून वेगवेगळ्या प्रदेशांचे प्रश्न जाणून घेता येतात. तेथिल वातावरण, तेथिल माणसे, तेथिल समाज जीवनाचे आकलन होते. प्रत्येक चलचित्रातून त्या त्या देशाची कथा सांगितल्या सारखे दिसते. आणि अर्थात या कथेतून निघालेला सार आपल्या मनाला स्पर्शून जातो. कधी भावनीक नजरेतून तर कधी सामाजीक नजरेतून यंदाचे सिनेमा नाही बघितले, पण पेपरातून आलेल्या गोष्टी वाचल्यावर दिसले फार छान सिनेमा होते, स्त्रीयांचा बंडखोरपणा, महिला शोषण समस्या इत्यादी गोष्टींवर प्रभाव पाडणारे होते. स्त्री निर्मात्या, स्त्री दिग्दर्शक, अभिनेत्री तसेच परिसंवादात भाग घेणाऱ्यांतही स्त्री प्रमुख्याने होत्या.  इफ्फीतील चलचित्रे आपण बघितलीच पाहिजेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com