Birthday Special: हेलन यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या खाजगी आयुष्यातील खास गोष्टी

हेलन (Helen) एक प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री आणि डान्सर आहेत.
Birthday Special: हेलन यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या खाजगी आयुष्यातील खास गोष्टी
Here are some special things about actress Helen's birthdayDainik Gomantak

हेलन (Helen) एक प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री आणि डान्सर आहेत. त्यांच्या काळातील सर्वात सुंदर अभिनेत्रींपैकी एक, हेलन सुमारे 700 चित्रपटांमध्ये दिसल्या आहेत. त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये गेट ऍपिअरन्स केले आणि अनेकांमध्ये सहाय्यक अभिनेत्री म्हणून काम केले, परंतु त्यांच्या नृत्यामुळे त्यांना सर्वाधिक प्रसिद्धी मिळाली. त्यांना बॉलिवूडची पहिली आयटम गर्ल देखील म्हटले जाते. आज त्यांचा वाढदिवस आहे, त्यांच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊया त्यांच्याशी संबंधित काही खास गोष्टी.

हेलन यांचे बालपण संघर्षमय होते

हेलन यांचा जन्म 21 नोव्हेंबर 1938 रोजी बर्मामध्ये झाला. त्यांचे वडील अँग्लो इंडियन आणि आई बर्मी होती. त्यांना एक भाऊ रॉजर आणि एक बहीण जेनिफर होती. दुस-या महायुद्धात त्यांच्या वडिलांचा मृत्यू झाला. त्यानंतर त्यांचे कुटुंब 1943 मध्ये आसाममध्ये स्थलांतरित झाले. हेलन यांचे कुटुंब भारतात आले तेव्हा युद्धजन्य परिस्थिती होती. हेलन यांनी स्वतः एका मुलाखतीदरम्यान सांगितले होते. कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी त्यांनी आपले शिक्षण सोडले होते.

Here are some special things about actress Helen's birthday
शिल्पा शेट्टी राज कुंद्राला देतेय घटस्फोट ?

हेलन 19 वर्षांच्या असताना त्यांना फिल्मी दुनियेत पाऊल ठेवण्याची संधी मिळाली. 'हावडा ब्रिज' या चित्रपटातून त्यांनी कामाला सुरुवात केली. कब या चित्रपटातील 'मेरा नाम चिन चिन चू' गाण्याने हेलन हार्टथ्रोब बनल्या. या गाण्यानंतर त्या बॉलिवूडमध्ये आयटम गर्ल म्हणून ओळखली जाऊ लागल्या. त्यांना हिंदी चित्रपटसृष्टीतील पहिली आयटम गर्ल देखील म्हटले जाते. हेलन त्या काळातील सर्वात हॉट अभिनेत्रींच्या श्रेणीत असायच्या. त्यावेळी त्यांना पडद्यावर पाहून लोक वेडे व्हायचे. त्यांच्या सौंदर्यासोबतच त्यांच्या नृत्यानेही प्रेक्षकांना भुरळ घातली. हेलन यांना सिनेमातील अभूतपूर्व योगदानासाठी फिल्मफेअर जीवनगौरव पुरस्कारही मिळाला आहे.

हेलन यांनी 1957 मध्ये त्यांच्यापेक्षा 17 वर्षांनी मोठ्या असलेल्या एका चित्रपट दिग्दर्शकाशी पहिले लग्न केले. त्यांचे नाव प्रेम नारायण अरोरा होते, परंतु हेलन यांचे लग्न 16 वर्षांनी तुटले. त्यांनी आपल्या पतीला घटस्फोट दिला कारण नवरा त्यांच्यावर ओझे बनला होता, तो हेलन यांच्या कमाईचा पैसा अनावश्यकपणे खर्च करत असे. त्यामुळे हेलनची आर्थिक स्थिती बिकट झाली. त्यांच्याकडे अपार्टमेंटचे भाडे द्यायलाही पैसे नव्हते.

घटस्फोटानंतर हेलन यांनी तिचे आयुष्य एकटे घालवले पण 1962 मध्ये 'काबिल खान' चित्रपटाच्या सेटवर हेलन यांची सलीम खानशी भेट झाली. हेलन इतक्या सुंदर होत्या की सलीम खान त्यांच्याकडे आकर्षित होत गेले. दोघांची भेट होऊ लागली, त्यावेळी सलीम खान विवाहित होते. पत्नी सुशीला यांचा या संबंधांवर आक्षेप होता पण तरीही सलीम यांनी हेलन यांच्याशी लग्न केले. बऱ्याच दिवसांपासून सलीम खानचे कुटुंबीय त्यांच्यावर नाराज होते. काही वर्षांनी सुशीलाने हेलन आणि सलीम खानचे नाते मान्य केले. सलमान खानसुद्धा हेलनला आपल्या आईप्रमाणे मानतो.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com