डोक्यावर टोपी नाकात माईक; हिमेशच्या गाण्यांनी भारताला वेड लावलं

हिमेश रेशमिया म्हणजे नाकातून गाणारा गायक म्हणत लोकं त्याची खिल्ली उडवायचे
Himesh Reshammiya
Himesh Reshammiya Dainik Gomantak

Himesh Reshammiya Birthday Special: बॉलिवूड अभिनेता, गायक आणि संगीत दिग्दर्शक हिमेश रेशमियाचा आज वाढदिवस आहे. हिमेश रेशमिया त्याचा 49 वा वाढदिवस साजरा करत आहे. हिमेश रेशमियाचा जन्म 23 जुलै 1973 रोजी गुजरातमध्ये झाला. बॉलीवूडचा गायक हिमेश रेशमिया म्हणजे नाकातून गाणारा गायक म्हणूत लोकं त्याची खिल्ली उडवत होते. मात्र, याच कारणामुळे हिमेश रेशमियाला अनेक पुरस्कार मिळाले आहेत. हिमेश रेशमियाने गायक-संगीत दिग्दर्शक असण्यासोबतच अनेक टीव्ही रिअॅलिटी शोचा देखील आहे.

सलमान खानच्या चित्रपटातून करिअरला सुरुवात

बॉलीवूडचा स्टार गायक हिमेश रेशमियाने आपल्या संगीत कारकिर्दीची सुरवात सलमान खानच्या चित्रपटातून केली. सलमान खानच्या या चित्रपटाचे नाव होते 'प्यार किया तो डरना क्या'. यानंतर हिमेशने संगीत दिग्दर्शक म्हणून मागे वळून पाहिले नाही. त्याने अनेक चित्रपटांमध्ये गाणी गायली आणि संगीत दिले. इतकेच नाही तर हिमेश रेशमियाचा 'आप का सुरुर' हा अल्बम भारतीय संगीत उद्योगाच्या इतिहासातील आतापर्यंतचा सर्वाधिक विकला जाणारा अल्बम आहे. विशेष म्हणजे 'आप का सुरुर' हा हिमेश रेशमियाचा पहिला म्युझिक अल्बम होता. हा अल्बम हिट झाल्यानंतर हिमेशला नाव आणि प्रसिद्धी दोन्ही मिळाली. हिमशने गायलेली 'आशिक बनाया आपने' आणि 'झलक दिखला जा' ही गाणी आजही लोकांच्या जिभेवर आहेत.

Himesh Reshammiya
Salman Khan: दबंग खानच्या जीवाला धोका? सुरक्षेसाठी मागितला शस्त्र परवाना

अभिनयातही आजमावले नशीब

हिमेश रेशमियाने केवळ संगीतच नाही तर चित्रपटांमध्येही आपले नशीब आजमावले. 2007 मध्ये 'आपका सुरुर' या चित्रपटातून हिमेशने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. याशिवाय कर्ज, कजरारे यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले. इतकेच नाही तर हिमेश रेशमिया हा पहिला कलाकार आहे ज्याने लंडनच्या वेम्बली स्टेडियममध्ये आपला परफॉर्मन्स दिला आहे.तर त्याच्या कजरारे या चित्रपटाचे चित्रीकरण जॉर्डनमधील पेट्रा येथे झाले आहे. या ठिकाणी शूट झालेला तो पहिला भारतीय चित्रपट ठरला.

Himesh Reshammiya
Russo Brothersच्या पार्टीला, धनुषसोबत गौरी-मलायका-साराने ग्लॅमरस स्टाईलमध्ये लावली हजेरी Photo

बॉलीवूडमधील हिमेशची सर्वोत्तम गाणी

हिमेश रेशमियाने बॉलिवूडमधील सर्वोत्कृष्ट गायकांपैकी एक आहे. हिमेशने नाम है तेरा, वीरानिया, आपके कशिश, कुछ तो समझो ना यांसारखी सर्व गाणी गायली आहे. त्यांनी गायलेले यूं तेरा-मेरा मिलना हे गाणे आजही लोकांच्या जिभेवर आहे. संगीतकार असण्यासोबतच हिमेश टीव्ही रिअॅलिटी शोचा जजही आहे. हिमेश रेशमिया 'सुपरस्टार सिंगर 2' आणि 'सा रे ग मा पा' सारख्या अनेक संगीत शोमध्ये जज म्हणून दिसला आहे. हिमेश रेशमियाने 11 मे 2018 रोजी टीव्ही अभिनेत्री सोनिया कपूरसोबत लग्न केले. 2017 मध्ये त्याने पहिली पत्नी कोमल हिला घटस्फोट दिला होता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com