हिंदी ही आता राष्ट्रभाषा राहिलेली नाही : अभिनेता किच्चा सुदीप

दक्षिणेत हिंदी चित्रपट का चालत नाहीत ?
kiccha sudeep
kiccha sudeepDainik Gomantk

राष्ट्रभाषा हिंदीच्या निमित्ताने देशातील राजकीय वर्तुळात चर्चा झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर विविध राज्यांतील लोकांनी परस्परांशी संपर्कासाठी इंग्रजीऐवजी हिंदीचा वापर करावा, अशी सूचना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काही दिवसांपूर्वी केली होती. त्यानंतर पुन्हा एकदा हिंदी सक्तीचा मुद्दा राजकीय वर्तुळात चर्चेला आला (Hindi is no longer the national language: Actor Kichha Sudip)

kiccha sudeep
सोनाक्षी सिन्हाचा फॅशनने भरलेला हॉटनेस पाहून चाहते घायाळ

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या प्रस्तावाला तमिळनाडू, तेलंगणा इत्यादी दाक्षिणात्य राज्यांमधील सत्ताधारी आणि राजकीय नेतृत्वाकडून विरोध केला जात आहे. या पार्श्वभूमीवर नुकतंच दाक्षिणात्य अभिनेता किच्चा सुदीप याने भाष्य केले. अभिनेता सुदीपने ‘R’-The Deadliest Gangster Ever या चित्रपटाच्या लाँचिंगला हजेरी लावली. यावेळी तो म्हणाला कि, हिंदी ही आता राष्ट्रभाषा राहिलेली नाही. तर सध्या संपूर्ण सिनेसृष्टी ही विविध भाषांवर चित्रपटांची निर्मिती करताना दिसत आहे.

kiccha sudeep
Photo: बॉलीवूड स्टारचा डॅशींग समर सनग्लास लूक

दरम्यान गेल्या काही दिवसांपासून दक्षिणेतील अनेक चित्रपट सुपरहिट ठरताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेला ‘केजीएफ: चॅप्टर टू’ हा बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करताना दिसत आहे. ‘केजीएफ: चॅप्टर वन’ हा १९८०च्या दशकाच्या सुरुवातीच्या काळातील पीरियड ड्रामा असून एका अनाथ माणसाची कथा आहे.

अप्रतिम अभिनय, सुंदर दृश्ये आणि मनोरंजक कथेच्या संगमामुळे या चित्रपटाने चाहत्यांच्या मनावर राज्य केले होते. यशचा ‘केजीएफ: चॅप्टर टू’ १४ एप्रिल २०२२ रोजी प्रदर्शित झाला या चित्रपटात यशसोबत संजय दत्त आणि रविना टंडन हे कलाकार मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. प्रशांत नील दिग्दर्शित हा चित्रपट तेलुगू, हिंदी, कन्नड आणि तामिळ या भाषांमध्ये प्रदर्शित झाला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com