Pathaan Movie: 'पठान' रीलीज केल्यास खबरदार; 'या' राज्यातील थिएटर मालकांना हिंदुत्ववाद्यांची धमकी

विश्व हिंदु परिषद, बजरंग दलाची चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी
Pathaan Movie
Pathaan MovieDainik Gomantak

Pathaan Movie: बॉलीवुडचा बादशाह शाहरुख खान याचा आगामी चित्रपट 'पठान' प्रदर्शनापुर्वीच गोत्यात आला आहे. या चित्रटातील 'बेशरम रंग' हे गाणे रीलीज झाल्यापासून त्या गाण्यात अभिनेत्री दीपिका पदुकोन हीने भगव्या (केशरी) रंगाची बिकीनी परिधान केल्याने काही जणांच्या भावना दुखावल्या आहेत. तो वाद ऐन भरात असतानाच आता देशातील एका राज्यात या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी हिंदुत्ववादी संघटनांनी केली आहे.

Pathaan Movie
Avtar 2: 'आरआरआर'च्या कमाईपेक्षा दुप्पट बजेट असलेला 'अवतार 2' येतोय...

विश्व हिंदु परिषद आणि बजरंग दल या हिंदुत्ववादी संघटनांनी 'पठान' या चित्रपटावर गुजरातमध्ये बंदी घालण्याची मागणी केली आहे. जर गुजरातमध्ये चित्रपट प्रदर्शित झाल्यास कोणत्याही अनुचित प्रकाराला थिएटर मालक जबाबदार असतील, असा इशाराच या संघटनांनी दिला आहे.

बेशरम रंग... या गाण्यातील दीपिकाच्या भगव्या बिकीनीवरून चित्रपटाला विरोध होत आहे. विहिंप आणि बजरंग दल यांनी म्हटले आहे की, 'चित्रपटाती या गाण्यातील अश्लीलतेशी हिंदुंचा भगवा रंग जोडला गेला आहे आणि गाण्याला 'बेशरम रंग' असे नाव देण्यात आले आहे. हे गाणे बॉलीवूडची हिंदूविरोधी विकृत मानसिकता दाखवते. ही दृश्ये असलेला चित्रपट आम्ही गुजरातमध्ये प्रदर्शित होऊ देणार नाही.

Pathaan Movie
Besharam Song Controversy : 'बेशरम रंग'वर भाजप नेते राम कदमांची टीका; म्हणाले, 'महाराष्ट्रात चित्रपट चालू देणार नाही'

मध्यप्रदेश, महाराष्ट्रात भाजप नेत्यांचा चित्रपटाला विरोध

मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी नुकतेच सांगितले होते की, गाण्याचे बोल आणि वेशभूषा बदलली नाही तर मध्य प्रदेशात चित्रपट प्रदर्शित करायचा की नाही यावर विचार करू. तर महाराष्ट्रातील भाजप आमदार राम कदम यांनी म्हटले आहे की, कोणताही चित्रपट हिंदूंच्या भावना दुखावत असेल तर तो कोणत्याही किंमतीत खपवून घेतला जाणार नाही. सध्या महाराष्ट्रात हिंदुत्ववादी सरकार आहे आणि हिंदूंच्या भावना दुखावणारा असा कोणताही चित्रपट महाराष्ट्रात प्रदर्शित होऊ देणार नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com