चित्रपटात दाखविल्या जाणाऱ्या 'या' आलिशान घरात आता तुम्हीही राहू शकता!

घर 12 डिसेंबर रोजी दरवाजे उघडेले जाणार, बूबी ट्रॅप्स आणि टॅरंटुलासह तुमच्यासाठी उपलब्ध असेल.
चित्रपटात दाखविल्या जाणाऱ्या 'या'
आलिशान घरात आता तुम्हीही राहू शकता!
RentDainik Gomantak

जर तुम्ही 1990 चा क्लासिक चित्रपट 'होम अलोन' (Home Alone) पाहिला असेल, तर तुम्हाला घरातील बूबी ट्रॅप्स आणि विचित्र वैशिष्ट्यांबद्दल आश्चर्य वाटले असेल जेथे 8 वर्षीय केविन मॅककॅलिस्टर (Kevin McCallister), ज्याची भूमिका मॅकॉले कल्किनने (Macaulay Culkin) केली आहे, जेव्हा त्याचे कुटुंब सुट्टीवर गेले आणि तेव्हा त्याला चूकुन मागे सोडले जाते. त्या घराची आवड असलेले लोक आता तिथे एक रात्र राहू शकता. व्हेकेशन रेंटल कंपनी Airbnb ने बुधवारी बातमी जाहीर केली की चित्रपटातील मॅककॅलिस्टर कुटुंबातील घर 7 डिसेंबरपासून बुक केले जाऊ शकते. 12 डिसेंबरपासून हे घराचे दरवाजे उघडेले जाणार आहेत. कोणीही एका रात्रीसाठी याचा लाभ घेऊ शकतो.

Rent
'83' मध्ये रोमाची भूमिका किती आहे हे मला माहिती नाही: कपिल देव

एअरबीएनबीने त्याच्या अधिकृत हँडलवरील इंस्टाग्राम पोस्टमध्ये म्हटले आहे की, अभिनेता डेव्हिन राट्रे (Devin Ratray), ज्याने केविनचा मोठा भाऊ बझ मॅककॅलिस्टरची भूमिका केली आहे, त्याचा 1992 चा सिक्वेल होम अलोन 2: लॉस्ट इन न्यूयॉर्क (Home Alone 2: Lost in New York) आणि नुकताच रिलीज झालेला होम स्वीट होम. तो एकटा, शिकागो परिसरातील घरात पाहुण्यांचे आयोजन करणार आहे. “उत्तम प्रकारे छाटलेले झाड, बूबी ट्रॅप्स, शिकागोचा उत्कृष्ट पिझ्झा, आणि अभिवादनांसह एक आरामदायक सुट्टीचा आनंद घेतील.

Airbnb ने घराचे आतील भाग दर्शविणाऱ्या फोटो सोशल मीडिया वरती शेअर केली आहेत. Airbnb वेबसाइटवरील एका नोटमध्ये असेही म्हटले आहे की "MacCallister च्या घरी पहिल्याच मुक्कामाच्या सन्मानार्थ, Airbnb शिकागोच्या ला रबिडा चिल्ड्रन हॉस्पिटलला एक वेळ देणगी देणार आहे, त्यांच्या जीवनाचा दर्जा वाढविन्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. आता 44 वर्षांचे असलेले मिस्टर रॅटरे यांनी लोकांना सांगितले की हे घर “31 वर्षांपूर्वी जसे होते तसे सजवले जाईल''.

Rent
रॉकस्टारचे 'ब्रह्मास्त्र' लवकरच सिनेरसीकांच्या भेटीला!

द वॉशिंग्टन पोस्टमधील दुसर्‍या अहवालात मिस्टर रॅट्रेयांनी असे म्हटले आहे की, घरात राहणारे पाहुणे नुकतेच प्रदर्शित झालेला डिस्ने प्लस चित्रपट, होम स्वीट होम अलोन पाहू शकतील. या चित्रपटात, मिस्टर रॅट्रे, 30 वर्षांनंतर पुन्हा बझ खेळण्यासाठी परत येणार आहेत, जो आता एक पोलिस आहे. घर $25 डॉलर (सुमारे 1800 रुपये) मध्ये उपलब्ध असेल. एका अहवालात म्हटले आहे की हे घर जास्तीत जास्त चार पाहुण्यांसाठी उपलब्ध असेल. Instagram वर, चित्रपटाच्या काही चाहत्यांना असे वाटले की या ऑफरने "बालपणीच्या आठवणी परत आणल्या जातील". एक चाहता होता ज्याने एअरबीएनबीला हिवाळा असल्याने हीटिंग सुविधा उपलब्ध असतील का असे विचारले. यावर, Airbnb ने उत्तर दिले की "तेथे हीटिंग आणि सर्व सुविधा असतील".

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com