अभिनेता झाला गरीबांसाठी देव; स्पाइस जेटने केला विशेष प्रकारे गौरव

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 22 मार्च 2021

सोनू सूदचा सन्मान करण्यासाठी स्टाइस जेटने आपल्या बोईंग 737 विमानावर अभिनेत्याचा फोटो लावला आणि त्यावर, 'मसीहा सोनू सूद यांना सलाम.' असे लिहिले आहे.

मुंबई: कोरोना साथीच्या आणि लॉकडाऊन दरम्यान अभिनेता सोनू सूदने बर्‍याच लोकांना सुरक्षितपणे त्यांच्या घरी पोहोचण्यास मदत केली होती. इतकेच नाही तर सोनू ने लोकांना लागणाऱ्या जिवनावश्यक वस्तू त्यांच्या घरीही पोहोचवल्या आहेत. प्रत्येकाने ट्विटवर सोनू सूदला टॅग केले आणि मदतीची मागणी केली आणि ती त्याने त्वरित पुर्ण केली. त्याच्या या कार्याचे केवळ देशातच नव्हे तर परदेशातही कौतुक झाले. म्हणून आत्ता विमान कंपनी स्टाइस जेटने कोरोना कालावधीत सोनू सूदच्या मानवी कृत्यांचे कौतुक केले आहे आणि त्याचा फोटो त्यांच्या विमानावर लावला आहे आणि त्याला खास शैलात सल्युट केला आहे.

सोनू सूदचा सन्मान करण्यासाठी स्टाइस जेटने आपल्या बोईंग 737 विमानावर अभिनेत्याचा फोटो लावला आणि त्यावर, 'मसीहा सोनू सूद यांना सलाम.' असे लिहिले आहे. हा सन्मान पाहून एकीकडे लोक आनंदी आहेत आणि आपला प्रतिसाद देत आहेत तर दुसरीकडे सोनू सूद यांनीही कंपनीचे आभार मानले आहेत.

'मी पहिल्यांदा सामान्य तिकीट घेऊन मोगाहून मुंबईला आलो होतो. तुमच्या प्रेमाबद्दल सर्वांचे आभार. मला माझ्या पालकांची खूप आठवण येत आहे.' असे म्हणत सोनू सुदने विमान कंपनीचे आभार मानले. यावर सोनू सूदचे चाहते आनंद व्यक्त करत आहेत.

सोनू सूद यांनी अशा प्रकारे लोकांना मदत केली की तो आता गरीबांसाठी देव झाला आहे. आणि म्हणूनच लोक त्याला मसीहा म्हणून ओळखतात. अलीकडेच सोनू सूद आपल्या मूळ गावी पंजाबमधील मोगा येथे लोकांना मदत करताना दिसला. त्यावेळी अभिनेत्याने तो रस्ता दाखविला होता जो त्याची स्व. आई सरोज सूद यांच्या नावावर आहे. 'माझ्यासाठी ही खूप खास जागा आहे. या रस्त्याचे नाव माझी आई प्रोफेसर सरोज सूद यांच्या नावावर आहे. मी माझे आयुष्य या रस्त्यावरुन घालवले आहे. माझे घर त्या बाजूला आहे आणि येथून मी माझ्या शाळेत जात होतो. माझे वडील येथून जात होते. जेव्हा महाविद्यालयात जायचे तेव्हा माझी आई या रस्त्यावरून जायची.' असे अभिनेता म्हणाला होता.

इतकेच नाही तर सोनू सूदवर लोक आता इतका विश्वास ठेवायला लागले की त्यांनी आता त्याची उपासना करायला सुरवात केली आहे. तेलंगणाच्या सिद्दीपेट जिल्ह्यातील दुब्बा टांडा गावच्या लोकांनी अभिनेत्याच्या सन्मानार्थ मंदिर बांधले असून त्यात सोनू सूद यांचा पुतळा देखील ठेवण्यात आला आहे. सध्या सोनू सूद आपल्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगमध्येही व्यस्त आहे. अभिनेत्याचे चाहते त्याच्या चित्रपटांची आतुरतेने वाट पाहत आहेत.

संबंधित बातम्या