दिलीप कुमार आणि राज कपूर यांच्या घरांचे होणार संग्रहालयात रूपांतर... पण!

The houses of Dilip Kumar and Raj Kapoor will be converted into pakistani  museums
The houses of Dilip Kumar and Raj Kapoor will be converted into pakistani museums

पेशावर: पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा प्रांतात राहणारे दिग्गज अभिनेते दिलीप कुमार यांच्या वडिलोपार्जित घराचे मालक यांनी त्यांचे घर सरकारने ठरविलेल्या किंमतीवर विकण्यास नकार दिला आहे. आणि त्यांनी सांगितले की, प्रशासनाने त्यांना कमी किमतीत हे घर मागितले आहे. त्याचबरोबर या मालमत्तेसाठी 25 कोटींची मागणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. 

प्रांतिक सरकारने पेशावरमध्ये चार मर्ला म्हणजे 101 चौरस मीटर पसरलेल्या या घराची किंमत 80.56 लाख रुपये ठेवली होती. दरम्यान घराचे मालक हाजीलाल मुहम्मद म्हणाले की, पेशावर प्रशासन जेव्हा त्यांच्याकडे संपर्क करणार तेव्हा या मालमत्तेसाठी 25 कोटी रुपये मागितले जातील. 2005 मध्ये त्यांनी सर्व औपचारिकता पूर्ण करून ही संपत्ती त्यांनी 51 लाख रुपयांना विकत घेतली आणि त्यांच्याकडे या घराचे सर्व कागदपत्रे देखील आहेत. 16 वर्षांनंतर या मालमत्तेची किंमत केवळ 80.56 लाख रुपये निश्चित करणे सरकारसाठी योग्य नाही. असे  मुहम्मद म्हणाले.

मोहल्ला खुदाबाद किस्सा ख्वानी बाजारामधील मालमत्ता खूप महाग आहे आणि तेथे प्रत्येक चौरस मिटरची किंमत पाच कोटी रुपये आहे, अशा परिस्थितीत ते आपल्या वकीलामार्फत प्रशासनाकडे 25 कोटींची मागणार आहे. "फक्त 4 चौरस मिटर जमीन फक्त 80.56 लाखाला कशी विकली जाऊ शकते?" असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.

यापूर्वी पेशावरमध्ये बॉलिवूड अभिनेता राज कपूर यांच्या वडिलोपार्जित घराच्या मालकाने 'कपूर हवेली' साठी 151.75 चौरस मीटरमध्ये असलेल्या संपत्तीसाठी 200 कोटींची मागणी केली होती, तर सरकारने 1.50 कोटी रुपये निश्चित केले होते. हे घर देखिल किस्सा ख्वानी मार्केटमध्येच आहे, जे अभिनेता दिलीप कुमार यांचे आजोबा दिवाण बशेश्वरनाथ कपूर यांनी 1918-22 दरम्यान बांधले होते. गेल्या महिन्यात, खैबर पख्तूनख्वाच्या मुख्यमंत्र्यांचे विशेष माहिती सहाय्यक कामरान बंगाश यांनी सांगितले की, दोन्ही घरे पुरातत्व संग्रहालयात रूपांतरित करण्यासाठी त्यांच्या मालकांसह प्रांतीय सरकार एक मैत्रीपूर्ण तोडगा काढेल अशी त्यांना आशा आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com