अनुष्काने विराटला अशा दिल्या 'व्हॅलेंटाईन डे'च्या शुभेच्छा

गोमन्तक वृत्तसेवा
रविवार, 14 फेब्रुवारी 2021

बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माने नुकताच एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे. विरूष्काने त्यांच्या मुलीचं नाव ‘वामिका’ असं ठेवलंय.

मुंबई. बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माने नुकताच एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे. विरूष्काने त्यांच्या मुलीचं नाव ‘वामिका’ असं ठेवलंय. सध्या अनुष्कामोठ्या पडद्यापासून दूर आहे, परंतु सोशल मीडियावर सक्रिय आहे.फोटो आणि व्हिडिओंद्वारे ती तिच्या चाहत्यांशी संवाद साधत आहे. आज ‘व्हॅलेंटाईन डे’निमित्त तिने सोशल मीडियावर पती विराट कोहलीसाठी एक रोमॅंटिक पोस्ट शेअर केली आहे. सोबत एक अतिशय रोमँटिक फोटो शेअर केला आहे, जे खूप व्हायरल होत आहे.

या ‘व्हॅलेंटाईन डे’ला विराट कोहली पत्नी अनुष्का शर्मापासून दूर आहे. कारण, भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना चेन्नईमध्ये खेळला जात आहे. विराट आणि अनुष्का दोघेही आपल्या व्हॅलेंटाईनपासून बरेच दूर आहेत. आज अनुष्काने पती विराट कोहलीसोबतचा एक गोंडस फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये ते दोघेही हसर्‍याने चेहऱ्याने एकमेकांकडे बघत एकमेकांच्या डोळ्यात हरवले आहेत.हा फोटो एका रम्य सूर्यास्तावेळी काढला आहे.

अनुष्काने फोटो शेअर करत लिहिले की, “तसा हा दिवस फार महत्तवाचा नसतो, पण आज असं वाटतंय, की हा व्हॅलेंटाईन डे सूर्यास्ताचे फोटो पोस्ट करण्यासाठी आहे. माझा आयुष्यभराचा व्हॅलेंटाईन.”

संबंधित बातम्या