Hrithik Roshan Upcoming Film : 'क्रिश 4 साठी अजुन वाट बघावी लागणार ? हृतिकचे 'फायटर' आणि 'वॉर 2'ही लवकरच...

अभिनेता हृतिकचे आगामी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत
Hrithik Roshan Upcoming Film Krrish 4 and Fighter
Hrithik Roshan Upcoming Film Krrish 4 and Fighter Dainik Gomantak

Hrithik Roshan Bollywood Films : हिंदीतल्या सर्वात यशस्वी स्टार्सपैकी हृतिकचं एक वेगळं स्थान आहे. गेले काही दिवस हृतिक त्याच्या कामात प्रचंड रोशनच्या बहुप्रतिक्षित सुपरहिरो फॅन्टसी चित्रपट 'क्रिश 4' वर काम सुरू झालं आहे. चित्रपटाची स्क्रिप्ट पूर्ण झाली असून त्याचे शूटिंग सुरू लवकरच सुरू होईल.

भारतातला एक महत्त्वाचा आणि एकमेव म्हणता येईल असा सुपरहिरो म्हणजे हृतिक. त्याच्या चित्रपटाच्या चर्चा वरचेवर होत राहतात. सध्या त्याच्या 'क्रिश 4'ची जोरदार चर्चा सुरूय.

राकेश रोशन 'क्रिश 4'च्या दिग्दर्शनाची कमान दुस-याकडे सोपवणार असल्याच्या बातम्या पूर्वी आल्या होत्या , पण आता या चित्रपटांबाबत आणखी काही अपडेट्स समोर आले आहेत. 

वास्तविक, नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत हृतिक रोशनने त्याच्या 'फाइटर', 'वॉर 2' आणि 'क्रिश 4' या चित्रपटांबद्दल महत्त्वाचे अपडेटस दिले आहेत.

या मुलाखतीत हृतिक रोशनने त्याच्या 'फाइटर' आणि 'क्रिश 4' या चित्रपटाविषयी काही मोठे अपडेट दिले आहे. 

आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असणारा हृतिक म्हणाला, 'आम्ही फायटरमध्ये खऱ्या-खुऱ्या लढाऊ विमानांसोबत शूटिंग करत आहोत. यातलं काही शुट आम्ही नुकतेच सुखोईमध्ये केले आहे. 

यावेळी आमच्या आजुबाजुला भारतीय वायुसेना असणे खूपच प्रेरणादायी होते. त्यांची देहबोली, शिस्त, धाडस आणि समजूतदारपणा यातून खूप काही शिकण्यासारखे होते. हा अनुभव मला मिळाला याचा मला आनंद आहे.  

Hrithik Roshan Upcoming Film Krrish 4 and Fighter
The Kashmir Files oscor Nomination :द कश्मिर फाईल्सच्या ऑस्कर वारीवर मिथुन दांनी केले गंभीर विधान..म्हणाले हे तर

'फाइटर'वर उत्तर दिल्यानंतर हृतिक रोशनला 'वॉर 2' आणि 'क्रिश 4'बद्दलही विचारण्यात आले. 'वॉर 2' बद्दल बोलताना हृतिक म्हणाला, 'आदित्य चोप्रा हा गोष्टी लपवून ठेवणारा माणुस आहे. त्यामुळेच मीसुद्धा यावर काही बोलू शकत नाही. 

 हृतिक म्हणाला, 'क्रिश 4' साठी सर्व काही तयार आहे पण काही तांत्रिक अडचणी आहेत. या वर्षाच्या अखेरीस या समस्या दूर होतील, अशी अपेक्षा आहे. 

'क्रिश'च्या चाहत्यांना त्यांचा सुपरहिरो पुन्हा एकदा पडद्यावर पाहायला वेळ लागणार असंच सध्या दिसतंय. 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com