अभिनेता ह्रतिक रोशनची लवकरच 'हॉलिवूड एन्ट्री'!

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 5 नोव्हेंबर 2020

हॉलिवूडपटात ह्रतिक रोशन एका गुप्तहेराची भूमिका साकारणार आहे. यासाठी त्याने आपल्या ऑडिशनचा व्हिडीओ शूट करून पाठवूनही दिला आहे. अजून ह्रतिकचा भूमिका ठरली नसली तरी 'क्रिश-4'चे शुट संपवून तो लवकरच अमेरिकेत जाणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.     

मुंबई-  यावर्षीच फेब्रुवारीमध्ये एका अमेरिकन टॅलेंट मॅनेजमेंट एजन्सीशी करार केला होता. ही एजन्सी ह्रतिकचं प्रमोशन करणार होती. आता आठ महिन्यांनंतर याबाबत एक सकारात्मक बातमी बाहेर आली असून ह्रतिक रोशनला एका हॉलिवूड पटात काम मिळाले असल्याची चर्चा आहे. मनोरंजन क्षेत्रातील काही अग्रगण्य मीडियाच्या रिपोर्ट्सनुसार लवकरच ह्रतिक रोशन आपल्या पहिल्या हॉलिवूड सिनेमाच्या शुटींगमध्ये दिसू शकतो.    

सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार या हॉलिवूडपटात ह्रतिक रोशन एका गुप्तहेराची भूमिका साकारणार आहे. यासाठी त्याने आपल्या ऑडिशनचा व्हिडीओ शूट करून पाठवूनही दिला आहे. अजून ह्रतिकचा भूमिका ठरली नसली तरी 'क्रिश-4'चे शुट संपवून तो लवकरच अमेरिकेत जाणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.     

ह्रतिकने याआधीही 'बँग बँग' आणि 'वॉर'मध्ये गुप्तहेरांच्या भूमिका साकारल्या असून या दोन्ही चित्रपटांमध्ये प्रेक्षकांनी त्याचे भरभरून कौतूकही केले आहे. आता हॉलिवूडमध्ये ह्रतिक हेराच्या भूमिकेत दिसेल की नाही हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. 
 

संबंधित बातम्या