Shahrukh Khan: "पठान मला नाही आवडला" चिमुरडीच्या व्हिडीओवर शाहरुखची मजेदार प्रतिक्रिया

अभिनेता शाहरुख खानचा पठान सर्वत्र हिट होत आहे पण एका चिमुरडीला मात्र हा चित्रपट अजिबात नाही आवडला
Shah Rukh Khan
Shah Rukh Khan Dainik Gomantak

पठानने रिलीजच्या दिवसापासुन आपला जलवा कायम राखला आहे. शाहरुख खानच्या 'पठाण' चित्रपटाची क्रेझ त्याच्या चाहत्यांमध्ये रिलीज झाल्यापासून कायम आहे. चार वर्षांनंतर 'पठाण' च्या माध्यमातून शाहरुख खानच्या पुनरागमनाने सर्वांची मने जिंकली आहेत आणि हा चित्रपट दररोज नवनवीन रेकॉर्ड बनवत आहे. 

शाहरुख खान देखील ट्विटरच्या माध्यमातून त्याच्या चाहत्यांशी जोडला जातो आणि अनेकदा एसआरके सेशन करून त्यांच्या प्रश्नांची उत्तरेही देतो. आता आता किंग खानने एका चिमुरडीच्या 'पठाण' न आवडल्याच्या व्हिडिओवर प्रतिक्रिया दिली आहे

खरं तर, एका तरुणाने ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तो तरुणीला विचारतो, 'कोणता सिनेमा पाहून अहाना आली?' यावर मूलगी 'पठाण' असे उत्तर देते. पण तिला पठाण आवडला का असे विचारल्यावर ती 'नाही' म्हणते. 

यानंतर तरुणाने याचे कारण विचारतो आणि व्हिडिओ संपतो. हा व्हिडिओ शेअर करताना शाहरुख खानला टॅग करण्यात आले आहे. यावर शाहरुखनेही आपली प्रतिक्रिया दिली आहे.

Shah Rukh Khan
Siddharth -Kiara Wedding: सिद्धार्थ-कियाराची लगीनघाई जोमात सूर्यगढ पॅलेस सजला...

या व्हिडिओवर शाहरुख खानने आता एक मजेशीर उत्तर दिले आहे, ज्याला सोशल मीडिया यूजर्सकडून पसंती मिळत आहे. किंग खानने लिहिले,

'अरे ओह...!! तुम्हाला अजून जास्त प्रयत्न करावे लागतील. ड्रॉइंग बोर्डकडे परत जा. लहान प्रेक्षकांना मी निराश करू शकत नाही. शेवटी हा देशातील तरुणांचा प्रश्न आहे. कृपया DDLJ बघा, कदाचित ही रोमँटिक टाईपची असेल... आपण मुलांना समजुन घेऊ शकत नाही.' शाहरुखच्या या उत्तराने नेटीझन्स मात्र खुष झालेत हे नक्की.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com