''मला अभिनेता व्हायचयं पॉर्नस्टार नाही''; बोल्डसीन वरुन 'या' अभिनेत्याने व्यक्त केलं मत
PARAS.jpg

''मला अभिनेता व्हायचयं पॉर्नस्टार नाही''; बोल्डसीन वरुन 'या' अभिनेत्याने व्यक्त केलं मत

छोट्या पडद्यावरील प्रसिध्द अभिनेता पारस छबडा (paras chhabra) बिग बॉस (Big Boss) 13 या रिअॅलिटी शोमधून प्रकाश झोतामध्ये आला. छोट्या पडद्यावरील प्रसिध्द अभिनेत्यांपैकी एक पारस  आहे. अनेक म्युझिक व्हिडिओमध्ये पारस दिसला आहे. लवकरच तो नव्या प्रोजेक्टमध्ये दिसणार आहे. दरम्यान पारसने त्याला मिळत असलेल्या भूमिकांविषयी चर्चा केली आहे. 

ईटाइम्स ला पारसने नुकतीच मुलाखत दिली आहे. या मुलाखतीदरम्यान पारसने त्याला मिळत असलेल्या भूमिकांविषयी सांगितले आहे. ''मला ओटीटी प्लॅटफॉर्मवर (OTT platform) काम करण्याची इच्छा आहे. त्यासाठी तशा ऑफर देखील येत आहेत. मात्र काम करताना कोणत्याही प्लॅटफॉर्मवर मर्यादा असू शकत नाहीत मात्र माझ्या स्वता:च्या काही मर्यादा आहेत. माझ्याकडे असे प्रोजेक्ट येत आहेत ज्यामध्ये बोल्ड सीन आहेत. परंतु मला वाटतं अशा सीनची फारशी गरज नसते. बोल्ड सीन आणि स्टोरी लाइनमध्ये कोणत्याही प्रकारचे कनेक्शन नसते. शोमध्ये मसाला म्हणून असे सीनचा वापर केला जातो. यामागील हेतू हा शो ची चर्चा व्हावी असा असतो.'' असे पारस ने म्हटले आहे. (I dont want to be an actor not a pornstar The Yaa actor did it from Boldseen)

पुढे पारस म्हणाला, ''मेकर्स आजकाल बोल्ड होण्याच्या प्रयत्नामध्ये कलाकारांना चुकीच्या पध्दतीने दाखवत आहेत. मला अभिनेता व्हायचयं पॉर्नस्टार नाही''

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Paras Chhabra™ (@parasvchhabrra)

दरम्यान, 'बिग बॉस 14'  मध्ये पारसने स्पर्धक आणि अभिनेत्री देवोलिना भट्टाचार्जीचे (Devolina Bhattacharjee) समर्थन करण्यासाठी एन्ट्री केली होती. तर बिग बॉस 14 ची विजेती असणारी रुबिना दिलेकसोबत (Rubina Dilek) एका म्युझिक व्हिडिओमध्ये दिसला होता.

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com