‘मी न्यूड सीन देणार पण...’

गोमंतक वृत्तसेवा
शनिवार, 1 मे 2021

भविष्यात मला न्यूड सीन देण्यास कोणत्याही प्रकारची समस्या नाही.

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका ‘भाभीजी घर पर है’ या मालिकेत गोरी मेम म्हणजेच अनिता भाभीची भूमिका प्रसिध्द अभिनेत्री नेहा पेंडसे (Neha Pendse) साकारताना दिसत आहे. तिला या भूमिकेत पाहताना चाहत्यांना चांगलाच आनंद होत आहे. काही दिवसांपूर्वीच नेहाने प्रियकर शार्दुलशी लग्नगाठ बांधली. त्यानंतर नेहाने भविष्यात न्यूड सीन देण्याविषयी एका मुलाखती दरम्यान वक्तव्य केलं होतं.

माध्यमांशी बोलताना नेहाला न्यूड सीनविषयी (Nude Scene) विचारण्यात आलं होतं. ‘’त्यावर तिने भविष्यात मला न्यूड सीन देण्यास कोणत्याही प्रकारची समस्या नाही. परंतु अशा चित्रपटामध्ये ज्याची कथा लव्ह मेकिंग आणि किसिंग सीन भोवती फिरत असते. एक वेळ अशी होती की, चित्रपटांमध्ये कोणताही ना लव्ह मेकिंग सीन ना किसिंग सीन मी केवळ माझ्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांची मने जिंकेन. चांगल्या चित्रपटामुळे मला एक गोष्ट समजली जर चित्रपटांचे निर्माते चांगले असतील आणि लव्ह मेकिंग सीन आणि किसिंग सीन योग्य पध्दतीने दाखवत असतील किंवा चित्रपटाच्या कथेमध्ये किसिंग सीन सीन आणि न्यूड सीन देण्याची गरज आहे तर मी नक्की देईन’, असं उत्तर नेहाने दिलं होतं. 

Death Anniversary: इरफान खानच्या सुंदर आठवणी चाहत्यांच्या मनात कैद

नेहा पुढे म्हणाली, ‘परंतु ज्या चित्रपटांची कथा केवळ किसिंग सीन आणि लव्ह सीन भोवतीच फिरत असेल तर मी अशा चित्रपटांमध्ये काम करु इच्छित नाही. मी चांगले बोल्ड सीन देखील पाहिले आहेत. ते निर्मात्यांनी तशापध्दतीने शूट केले आणि चित्रपटांमध्ये दाखवले. कधी कधी चित्रपटांमध्ये न्यूड सीन चुकीच्या पध्दतीने दाखवण्यात येतात. प्रत्येकाची विचार करण्याची पध्दत वेगवेगळी असते.’
 

संबंधित बातम्या