''जर मी मुख्यमंत्री झाली तर..'' हुमा कुरेशीने केला खुलासा

गोमंन्तक वृत्तसेवा
शनिवार, 29 मे 2021

हुमा लवकरच 'महाराणी' या वेबसिरीजमधून प्रेक्षकांना भेटणार आहे.

बॉलिवूडमधील प्रसिध्द अभिनेत्री हुमा कुरेशी (Huma Qureshi) सध्या तिच्या खासगी आणि प्रोफेशनल लाईफमुळे पुन्हा एकदा चर्चेच आली आहे. कोरोना (Covid 19) रुग्णांसाठी हुमाने 100 बेड्सच्या रुग्णालयाची व्यवस्था केली आहे. दुसरीकडे हुमा लवकरच 'महाराणी' या वेबसिरीजमधून (Maharani Web Series) प्रेक्षकांना भेटणार आहे.  या वेबसिरिजमध्ये हुमा बिहारच्या माजी मुख्यमंत्री राबडी देवी (Rabri Devi) यांच्या भूमिकेत दिसणार आहे. यानिमित्त हुमाने मुलाखत दिली आहे. या मुलाखतीत हुमाने वेबसिरिज आणि इतर अनेक गोष्टींवर चर्चा केली आहे. (If I become the Chief Minister Huma Qureshi revealed)

नुकतंच हुमाने दिलेल्या मुलाखतीत खऱ्या आयुष्यात मुख्यमंत्री झाल्यावर काय वाटेल ते सांगितले आहे. ''देशात सुरु असलेल्या राजकारणाबद्दल तुझं काय मत आहे आणि भविष्यात तू कधी मुख्यमंत्री झाली तर तुला कसं वाटेल?'' असा प्रश्न हुमाला विचारण्यात आला होता. त्यावर उत्तर देताना हुमा म्हणाली, ''मला राजकारण काहीही समजत नाही. मी यावर गप्प बसते. कारण राजकारण हा विषय समजण्यापलीकडचा आहे. जर मी भविष्यात मुख्यमंत्री झाली तर मी त्याला एक भयानक स्वप्न समजून गाढ झोपी जाईन,'' असं हुमा म्हणाली.

Jawaharlal Nehru Death Anniversary: बॉलिवूडच्या या प्रमुख कलाकारांनी साकारली...

पुढे ती तिच्या आगामाी वेबसिरिजमधील बिहारच्या मुख्यमंत्री राबडी देवी यांच्या भूमिकेबद्दल विचारण्यात आले असताना हुमा म्हणाली,  ''राणी  ही भूमिका माझ्या आयुष्यातील एक कठीण आणि आव्हानात्मक भूमिका आहे. त्यांच्या बोलण्याच्या लहेजापासून ते चालण्याची पध्दत या सगळ्या गोष्टीवर काम करावे लागले. बिहारची बोली भाषा मी 'गॅंग्ज ऑफ वासेपुर' (Gangs Of Wasseypur) मध्ये बोलली होती, त्यामुळे त्यात मला फारशी अडचणी आली नाही. परंतु राणीची बिंदी, साडी, मंगळसूत्र, बिछिया, स्टाईल ही सगळी एका विवाहित स्त्रीची चिन्हे असतात हे सगळं देखील वेगळं होतं.'' 

'महाराणी' या वेबसिरिजचे दिग्दर्शन करण शर्मा करत आहेत. तर या वेबसिरीजचे निर्माते सुभाष कपूर आहेत. या वेबसिरिजमध्ये हुमा सोबत सोहम शहा, अमिक सियाल, विनित कुमार मुख्य भूमिकेत दिसणार आहे. तसेच हुमा लवकरच हॉलिवूडच्या जॉम्बी चित्रपट 'आर्मी ऑफ द डेड' या चित्रपटातून हॉलिवूडमध्ये एन्ट्री करणार आहे.

 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Huma S Qureshi (@iamhumaq)

संबंधित बातम्या