जेवण नाही तर किमान एक ग्लास पाणी तरी द्या- झोमॅटोबद्दल राखी झाली हळवी
If not a meal give at least a glass of water Rakhi for Zomato

जेवण नाही तर किमान एक ग्लास पाणी तरी द्या- झोमॅटोबद्दल राखी झाली हळवी

मुंबई: (If not a meal give at least a glass of water  Rakhi for Zomato) झोमॅटोसाठी फूड डिलिव्हरी करणाऱ्याने आपल्याला मारहाण केली असल्याचा आरोप बंगळूरुमधील कंटेट क्रिएटर हितेशा चंद्राणीने केला होता. त्यासंबंधीचा तिने व्हिडिओसुध्दा सोशल मिडियावर शेअर केला होता. त्यानंतर झोमॅटोच्या डिलिव्हरी बॉयला अटक करण्यात आली. तर काही दिवसांपूर्वीच त्याला जामीन मिळाला.

या प्रकरणावर बॉलिवूडमधील प्रसिध्द अभिनेत्री राखी सावंतने या प्रकरणावर प्रकाश टाकला आहे. ''त्याच्यावर अन्याय झाला आहे. मला खूप वाईट वाटत आहे. मित्रांनो झोमॅटोवाले तुमच्या घरी तुमचं पोट भरावं म्हणून अन्न घेऊन येतात. त्यांचा आदर करा. त्यांना प्रेमाने वागणूक द्या. सगळीकडे कोरोनाचं सावट असताना ते नोकरी करतात. मी असं म्हणत नाही त्यांना जेवायला द्या परंतु त्यांना एक ग्लास पाणी तर देऊ शकता. आपण त्यांना आदर आणि मान तर देऊ शकतो. त्यासाठी आपणाला कोणत्याही प्रकारचा कर भरावा लागत नाही,’’ असं राखीने सोशल मिडियावरील इनस्टाग्रामच्या व्हिडिओ पोस्टमध्ये म्हटले आहे. आणि राखीच्या या प्रतिक्रियेला नेटकऱ्यांनी चांगलीच पसंती दिली आहे. (If not a meal give at least a glass of water  Rakhi for Zomato)

यावर झोमॅटोसाठी फूड डिलिव्हरी करणाऱ्या कामराजने आपली प्रतिक्रीया देत म्हटले की, ‘’महिलेकडून माझ्यावर खोटे आरोप करण्यात आले आहेत. या महिलेनेच मला मारहाण केली. मारहाण करताना तिच्या हातातील अंगठी तिच्याच नाकाला लागली आणि नाकातून रक्त येऊ लागलं.’’

तर दुसरीकडे कंटेट क्रिएटर हितेशा चंद्राणीने सोशल मिडियावर एक व्हिडिओ शेअर करत याच डिलिव्हरी बॉयने मला मारहाण केली असल्याचा अरोप केला होता.

त्यानंतर अनेक सेलिब्रेटिंनी या प्रकरणात उडी घेत आपली मते व्यक्त केली. नुकतच अभिनेत्री परिणिती चोप्रानेदेखील ट्विट करत या डिलिव्हरी बॉयची बाजू घेतली होती. यावरुन अभिनेत्री तनुश्री दत्ताने हितेशाची बाजू घेत परिणितीला सुणावलं होतं.    

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

 
 

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com