विराट कोहली नाही तर कोण आहे अनुष्काचा ‘सिरिअल चिलर’ मित्र?

दैनिक गोमन्तक
मंगळवार, 5 जानेवारी 2021

अभिनेत्री अनुष्का शर्माने तिच्या पाळीव प्राण्याबरोबर  नुकताच एक गोंडस फोटो शेअर केला आहे. 

नवी दिल्ली: अभिनेत्री अनुष्का शर्माने तिच्या पाळीव प्राण्याबरोबर  नुकताच एक गोंडस फोटो शेअर केला आहे.  अभिनेत्री अनुष्का शर्मा गरोदर असून लवकरच ती तिच्या बाळाला जन्म देणार आहे. सध्या अनुष्का तिचा प्रेग्नंसी काळ एन्जॉय करत असून या काळातील अनेक फोटो, व्हिडीओ ती चाहत्यांसोबत शेअर करत आहे. यामध्येच सध्या सोशल मीडियावर अनुष्काचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये ती तिच्या फिटनेसकडे लक्ष देताना दिसत आहे.

क्रिकेटपटू विराट कोहलीची पत्नी बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा प्रेग्नंट असून ती लवकरच आई होणार आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून अनुष्का आणि विराटने ही गूडन्युज दिली. तेव्हापासून सातत्याने चाहत्यांमध्ये अनुष्काचीच चर्चा सुरु आहे. दरम्यान अनुष्काने सोशल मीडियावर नुकताच एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमुळे अनुष्का पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

सोशल मिडियावर व्हायरल झालेला हा फोटो अनुष्काने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. फोटोमध्ये अनुष्का झोपलेली असून तिच्याशेजारी तिचा पाळीव कुत्रा आहे. “मी आणि माझा मित्र, आम्ही दोघं घरातले सीरिअल चिलर आहोत”, असं कॅप्शन अनुष्काने त्या फोटोला दिलेलं  आहे.

अनुष्का लवकरच या महिन्यात आई होणार आहे. त्यामुळे सध्या ती तिची पुर्णपणे काळजी घेताना दिसत आहे. प्रेग्नंसीच्या काळात अनुष्का फिट आणि हेल्दी राहण्यासाठी विशेष प्रयत्न करतांना दिसत आहे. येत्या मे किंवा जूनपर्यंत अनुष्का पुन्हा एकदा तिच्या आगामी प्रोजेक्टवर काम करणार असल्याच्या चर्चा चाहत्यांमध्ये आहे.

आणखी वाचा:

प्रेग्नेन्सीमध्ये अनुष्काचा शिर्षासनानंतर ट्रे़डमीलवरचा Video व्हायरल -

संबंधित बातम्या