सिनेमा उत्कृष्‍ट ठरतोय माध्यम..!

युवा पिढीला देशाचा इतिहास सांगण्यासाठी सिनेमाचे माध्यम त्यासाठी उत्कृष्‍ट आहे
सिनेमा उत्कृष्‍ट ठरतोय माध्यम..!
IFFI 2021 Cinema Great Medium Dainik Gomantak

पणजी IFFI 2021: आपल्या देशाच्या इतिहासात काय घडले याचे ज्ञान आजच्या पिढीला असणे गरजेचे आहे. सिनेमाचे माध्यम त्यासाठी उत्कृष्‍ट आहे, असे मत ‘उधम सिंह’ या सिनेमाचे निर्माते सुजीत सरकार यांनी व्यक्त केले. ते मास्टर क्लास सत्रात बोलत होते. यावेळी त्यांनी सिनेमा निर्मीती करतानाचा अनुभव सांगितला.

IFFI 2021 Cinema Great Medium
‘गंगापुत्र’ : एका नि:स्वार्थी माणसाची अजरामर गोष्ट

हीरोइर्झमपेक्षा सामान्य माणसाच्या वास्तववादी कथा सिनेमातून मांडायला हव्यात. ‘उधम सिंह’ सिनेमा हा स्‍क्रिप्टेड सिनेमा नसून खऱ्या घटनेवर आधारीत आहे. हा सिनेमा तयार करण्यापूर्वी मी भगतसिंगवर सिनेमा तयार करणार होतो. पण त्याचवेळी मला ‘उधम सिंह’ यांच्याविषयी समजले व त्‍यांच्‍यावर सिनेमा करण्यास प्राधान्य दिले, असे ते म्हणाले. यावेळी जलियानवाला बागचा अभ्यास, त्याचा इतिहास समजून घेणे व तो हुबेहुब मांडणे यावर भर दिला, असेही त्‍यांनी स्‍पष्‍ट केले.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com