'संजीव कुमार' यांचा अभिनयातील प्रवास..
IFFI 2021 : Sanjeev Kumar's journey in acting ..Dainik Gomantak

'संजीव कुमार' यांचा अभिनयातील प्रवास..

2019 साली येणाऱ्या या पुस्तकाचे प्रकाशन कोरोनामुळे 2021 साली करण्यात आले.

IFFI 2021: संजीव कुमार यांचा अभिनयातील प्रवास आजच्या सिनेक्षेत्रात काम करू पाहणार्‍या पिढीसाठी प्रेरणादायी आहे असे मत लेखक सुमंत बत्रा यांनी मास्टरक्लास दरम्यान बोलताना व्यक्त केले."अॅन एक्टर्स एक्टर-द आॅटोबायोग्राफी आॅफ संजीव कुमार या त्यांच्या पुस्तकाविषयी ते बोलत होते.

IFFI 2021 : Sanjeev Kumar's journey in acting ..
आला लेट पण आंतरराष्ट्रीय चित्रपट स्पर्धेत गेला थेट..!

मी पेशाने वकील आहे.मात्र सिनेमा पाहण्याच्या आवडीने मला संजीव कुमार यांच्या अभिनयाचा चाहता केला. आणि त्यामुळेच मी त्यिंच्याविषयी लेखन केले आहे असे बत्रा यांनी सांगितले. संजीव कुमार यांचा अभिनस क्षेत्रातील प्रवास,त्यांचा अभिनय,त्यांनी वठवलेल्या भुमिका,त्यांचा संघर्ष अन त्यांच्या विषयी अन्य बाबतीत मी लेखन केले आहे.

2019 साली येणारे हे पुस्तक कोरोनामुळे 2021 साली प्रकाशन करण्यात आले.पुस्तकाची मुळ आवृत्ती इंग्रजी भाषेत असून लवकरच ते मराठी,हिंदी आणि गुजराती भाषेत येणार असल्याची माहीती त्यांनी दिली. या पुस्तकासाठी 102 जणांच्या मुलाखती घेण्यात आल्या.तर लेखनानिमित्त दिल्लीहून मुंबईत येणे झाले.

संजीव कुमार अभिनयातील मास्टर होते.ते आपल्या अभिनयाविषयी फोकस्ड होते.त्यांना जिवनात एक्टरच व्हायचे होते.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com