आला लेट पण आंतरराष्ट्रीय चित्रपट स्पर्धेत गेला थेट..!
IFFI 2021: IFFI 2021 Vasantrao film Reached In International Film CompetitionDainik Gomantak

आला लेट पण आंतरराष्ट्रीय चित्रपट स्पर्धेत गेला थेट..!

'पंडित वसंतराव देशपांडे' यांची जीवनगाथा सांगणारा चित्रपट आज जागतिक पातळीवर पोहोचला आहे.

IFFI 2021 : 'पंडित वसंतराव देशपांडे' यांची जीवनगाथा सांगणारा चित्रपट (Movie) आज जागतिक पातळीवर पोहोचला आहे. एकेकाळी या चित्रपटाबाबत काही हितचिंतकांच्या मनात साशंका होती परंतु त्यांची चिंता दूर होऊन ‘मी वसंतराव’ या चित्रपटाच्या संपूर्ण टीमला इफ्फीत ‘रेड कार्पेट’चा मान देण्यात आला ही खरचं खूप मोठी गोष्ट आहे.

IFFI 2021: IFFI 2021 Vasantrao film Reached In International Film Competition
‘मी वसंतराव’ला ‘रेड कार्पेट’चा मान

या चित्रपटासाठी त्यांचा गायक नातू राहुल देशपांडे याने त्यांचा रोल प्ले केला असून, या चित्रपटासाठी बरीच वर्षे कालावधी लागला, चित्रपट पूर्णत्वाकडे गेला आणि लॉक डाउनमुळे हा चित्रपट प्रदर्शित होऊ शकला नाही. परंतु म्हणतात ना 'लेट बट थेट' याची प्राचीती आली, कारण हा चित्रपट इफ्फीच्या इंडियन पॅनोरमाबरोबरच आंतरराष्ट्रीय चित्रपट स्पर्धेसाठी भारतातून निवड झालेला सिनेमा आहे.

जेष्ट गायक पंडित वसंतराव देशपांडे यांची कारकीर्द तशी बघायला गेलं तर कमीच अगदीच स्पष्ट सांगायचं झालं तर कमी जास्त असेल परंतु 30 वर्षे कारण त्यांचे निधन खूप लवकर झाले. त्यांच्या यशोगाथेची अनटोल्ड स्टोरी तुम्हाला या चित्रपटाच्या मध्यमातून कळणार आहे. खडतर आयुष्यात सवरायचं कसं हे पंडित वसंतराव देशपांडे यांच्या कडून शिकण्यासारखे आहे. लहान वयात अनाथ झालेलं मूल कठोर परिश्रमाने आपली स्वतःची ओळख निर्माण केली आहे.

IFFI 2021: IFFI 2021 Vasantrao film Reached In International Film Competition
सिनेमा उत्कृष्‍ट ठरतोय माध्यम..!

दरम्यान 'मी वसंतराव' या चित्रपटाचे दिग्दर्शक निपुण धर्माधिकारी यांनी 'मी वसंतराव' या चित्रपटाला संधी दिल्याबद्दल IFFI चे आभार व्यक्त केले. दैनिक गोमंतकला दिलेल्या मुलाखतीत बोलताना त्यांनी चित्रपट बनवतानाचा अनुभव सांगितला ते म्हणाले, लोक मला प्रश्न करतात की हा चित्रपट करताना तुम्हाला काही दडपण होत का ? तर मी नेहमी हेच संगत आलोय की या गोष्टीचं दापण मला कधीच नव्हते कारण मी वसंतराव यांना त्यांच्या घरच्यांकडून पदोपदी अनुभवत होतो, त्यांच्याबद्दल ऐकत होतो, ते आपल्यात न्हावते परंतु त्यांच्या ज्या आठवणी कुटुंबासोबत होत्या केवळ या मुळे हा चित्रपट शक्य झाला, मी आवर्जून सांगेन ज्यांचं ध्येय, स्वप्न एक कलाकार होणं आहे त्यांच्यासाठी हा चित्रपट खरचं खूप मोलाचा आहे.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com