IFFI: इंडियन पॅनोरमा विभागात यंदा गोमंतकीय चित्रपटाला नो एंट्री

बर्‍याच वर्षानंतर असे घडते आहे की, यंदा इंडियन पॅनोरमा विभागात दुर्दैवाने एकही गोमंतकीय चित्रपट नाही.
IFFI 52 Indian Panorama section does not have Gomantak film this year
IFFI 52 Indian Panorama section does not have Gomantak film this yearDainik Gomantak

यंदा इंडियन पॅनोरमा विभागात दुर्दैवाने एकही गोमंतकीय चित्रपट नाही. बर्‍याच वर्षानंतर असे घडते आहे. गोव्यात इफ्फी सुरू झाल्यापासून एखाद्या तरी गोमंतकीय सिनेमाची निवड या विभागात व्हायची. इंडियन पॅनोरमाच नव्हे तर देश-विदेशातल्या अनेक महत्त्वाच्या चित्रपट महोत्सवांमधून गोमंतकीय चित्रपटांनी आपली बाजी मारलेली आहे.

IFFI 52 Indian Panorama section does not have Gomantak film this year
इफ्फीतला ‘इंडियन पॅनोरमा विभाग’ महत्त्वाचा का असतो?

परंतु गेल्या काही वर्षात चित्रपट अनुदानाच्या बाबतीत गोवा सरकारने घातलेला घोळ, चित्रपट निर्मात्यांचे अडकलेले पैसे, ‘ईएसजी’ संस्थेची गोमंतकीय चित्रपटांप्रती असलेली कमालीची बेपर्वाई यामुळे गेल्या दीड वर्षात चित्रपटात पैसे गुंतवण्याचे धाडस कुणाला झालेले नाही. खरी कमाल म्हणजे गोमंतकीयानी चित्रपट निर्मिती केलेलीच नसणार हे गृहीत धरून ‘ईएसजी’ने यावर्षी ईफ्फीतल्या ‘गोवा विभागा’साठी आजवर प्रवेशिकाही मागवल्या नव्हत्या. स्वतःच्या अकार्यक्षमतेवर दाखवलेल्या या उच्च दर्जाच्या विश्वासाबद्दल त्यांचे कौतुक करावे तितके थोडे.

IFFI 52 Indian Panorama section does not have Gomantak film this year
IFFI 52मध्ये इंडियन पॅनोरमासाठी 25 चित्रपटांची निवड

‘मी वसंतराव’ (दिग्दर्शक: निपुण अधिकारी), ‘बीटरस्वीट’ (दिग्दर्शक: अनंत महादेवन), ‘गोदावरी’ (दिग्दर्शक: निखिल महाजन), ‘फ्युनरल’ (दिग्दर्शक: विवेक दुबे) ‘निवास’ (दिग्दर्शक: मेहुल अगजा) हे फीचर विभागात निवड झालेले मराठी सिनेमा आहेत. ‘मर्मर्स आफ जंगल’ (दिग्दर्शक: सोहील वैद्य) हा नॉन फिचर विभागात निवड झालेला मराठी लघुपट आहे.

इंग्रजी, मल्याळम, तामिळ, तेलुगू, संस्कृत या प्रस्थापित भाषेव्यतिरिक्त बोडो, दिमसा, मिशिंग, गर्हवाली, संथाळी अशा फार कमी ठाऊक असलेल्या भारतीय भाषांमधल्या चित्रपटांचा समावेशही इंडियन पॅनोरमा विभागात आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com