भारत-बांगला बंधुत्वाचे नाते; सुरक्षित गोव्याचा संदेश देत 'इफ्फी'ची सांगता

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 25 जानेवारी 2021

भारत - बांगला देश एकच आहेत, वेगळे नाहीत, दोन्ही देशांतील बंधुत्वाचे नाते अनोखे आहे, इफ्फीतूनही ते जपले गेले, हा आनंददायी क्षण असल्याचे प्रतिपादन आज ज्येष्ठ अभिनेते विश्वजित चटर्जी यांनी केले.

पणजी :  भारत - बांगला देश एकच आहेत, वेगळे नाहीत, दोन्ही देशांतील बंधुत्वाचे नाते अनोखे आहे, इफ्फीतूनही ते जपले गेले, हा आनंददायी क्षण असल्याचे प्रतिपादन काल ज्येष्ठ अभिनेते विश्वजित चटर्जी यांनी केले.

बांबोळी येथील श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियममध्ये ५१ व्या इफ्फीच्या समारोप सोहळ्यात श्री. चटर्जी यांचा राज्यपाल भगतसिंग कोशियारी यांच्या हस्ते यंदाच्या इफ्फीतले विशेष भारतीय व्यक्तिमत्त्व म्हणून ‘जीवनगौरव’ पुरस्कारांने सन्मान करण्यात आला. त्यावेळी केंद्रीय पर्यावरण राज्यमंत्री बाबुल सुप्रियो, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, केंद्रीय माहिती मंत्रालयाचे अधिकारी व्यासपीठावर होते.

श्री. विश्वजीत यांनी गौरविल्याबद्दल ऋणनिर्देश करताना जुन्या आठवणीना उजाळा दिला. सिनेमा ही एक कला आहे, मनापासून आवड असल्यास कलेला वेगळी दिशा मिळू शकते, असे त्यांनी नमूद केले. कलाकाराने कलेवर सतत प्रेम करावे, तिला अंत नसतो, जे कराल ते मन लावून करा, स्वतःवर विश्वास ठेवा असा सल्ला त्यांनी दिला. बांगला देश व आपले वेगळे नाते असून बांगला देशवर हल्ला झाला त्यावेळी लोकप्रिय दिग्दर्शक ऋत्विक घटक माझ्यासमवेत मुंबईला होते, बंगबंधू शेख मुजीबूर रेहमान यांच्या प्रेरणादायी भाषणांनी आम्हाला प्रेरणा मिळायची अशी माहिती त्यांनी दिली.

सिनेमा सगळ्यांना एकत्र आणणारी कला असून सिनेमा वैश्विक आहे, इफ्फी जागतिक एकजूट बांधणारा, नवे नाते जोडणारा आणि कोविडसारख्या संकटात नव्या आव्हानाना सामोरे जाणारा असल्याचे उदगार राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांनी काढले. 

संकटांतही एकत्र आणणाऱ्या इफ्फीने परंतु, पण या शब्दांवर मात केली आहे. सिनेमा ही कला आहेच पण सिनेमा म्हणजे मानवी भावनांचा मिलाफ असतो, मानवाला तो आपल्याशी जोडतो असे केंद्रीय मंत्री बाबुल सुप्रियो म्हणाले. दिग्दर्शक, निर्माते राहुल रवैल, शाहजी करूण, प्रियदर्शन नायर, खासदार रवीकिशन समारोप सोहळ्याला उपस्थित होते. अभिनेत्री सिमॉने सिंग यांनी सूत्रसंचालन केले.

Varun Dhawan Wedding : जाणून घ्या वरून धवनची पत्नी नताशा आहे तरी कोण? 

समारोप सोहळ्याला अतिथी म्हणून उपस्थित असलेल्या झिनत अमान यांचा सन्मान श्री. सावंत यांच्या हस्ते करण्यात आला. त्यांनी आपल्या भाषणात इफ्फीच्या आयोजनाची स्तुती केली, सुंदर इफ्फी असे त्या म्हणाल्या.

संदेश सुरक्षित गोव्याचा

गोवा म्हणजे वाळू, समुद्र नव्हे, तर सुरक्षित प्रदेशही आहे, असा संदेश इफ्फीतून जाईल, असा विश्वास मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी व्यक्त केला. ते म्हणाले, कोविडच्या संकटातही गोव्याने इफ्फीचे आव्हान स्वीकारले. भारतात दोन लसी तयार झाल्या असून त्यामुळे कोविड हरणार, भारत जिंकणार हे स्पष्ट झाले असल्याचे त्यांनी नमूद केले. जगही भारताजवळ कोविड लसीमुळे येत असल्याचे ते म्हणाले. ५२ व्या इफ्फीचे आयोजन चांगले करू, गोव्यात सिने चित्रीकरणासाठी या, सहकार्य देऊ असे आवाहनदेखील केले.

संबंधित बातम्या