लेट पण थेट..!; जानेवारीमध्ये होणाऱ्या 'इफ्फी'साठी नाव नोंदणी सुरू

गोमन्तक वृत्तसेवा
बुधवार, 18 नोव्हेंबर 2020

यावर्षीचा इफ्फी १६ ते २४ जानेवारी २०२१ या कालावधीत पार पडणार आहे. दरवर्षी इफ्फी २० ते २८ नोव्हेंबर या कालावधीत होतो. यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर इफ्फी पुढे ढकलण्यात आला होता. 

पणजी- गोव्यात होणाऱ्या ५१व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी नावनोंदणी सुरु करण्यात आली आहे. यावर्षीचा इफ्फी १६ ते २४ जानेवारी २०२१ या कालावधीत पार पडणार आहे. दरवर्षी इफ्फी २० ते २८ नोव्हेंबर या कालावधीत होतो. यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर इफ्फी पुढे ढकलण्यात आला होता. 

यावर्षी आभासी तसेच प्रत्यक्ष अशा दोन्ही पद्धतीने इफ्फी पार पडणार आहे. ज्यांना इफ्फीसाठी स्वतःचे नाव नोंदवायचे आहे त्यांनी  https://t.co/tSKgrrlpFL या लिंकला भेट देण्याचे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी तुम्ही  https://t.co/QyoGzqMbk7 आणि https://t.co/OojdBeDp0g या लिंकचा वापरही करू शकता. 

 दरम्यान, यावर्षीच्या महोत्सवाचे नेमके स्वरूप येत्या काही दिवसातच रसिकांच्या समोर ठेवण्यात येणार आहे. शिवाय कोरोनाच्या बाबतीत असणाऱ्या सर्व प्रकारच्या शिष्टाचाराचा विचार करून प्रत्येक गोष्टीचे नियोजन केले जाणार असल्याची माहिती गोवा मनोरंजन संस्थेकडून देण्यात आली. 

संबंधित बातम्या