Alia Bhatt : आलीया भट्ट ठरली इम्पॅक्टफुल इंटरनॅशनल वुमन ऑफ 2023...बॉलिवूडची एकमेव अभिनेत्री

अभिनेत्री आलिया भट्टला आता एक नवीन सन्मान मिळाला आहे.
Alia Bhatt
Alia BhattDainik Gomantak

अलिया भट्ट एक चांगली आणि प्रगल्भ अभिनेत्री आहे. क्यूटनेससोबत अलिया आपल्या कामाच्या बाबतीतही तितकीच आग्रही असते स्क्रिप्टची निवड आणि आपला अभिनय यावर आलिया खूप गंभीर असते.
काही दिवसांपूर्वी आलीयाला दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाला होता, आता यानंतर आलीयाचा अजुन एक सन्मान झाला आहे. 2023 च्या प्रभावशाली आंतरराष्ट्रीय महिलांच्या यादीत तिचे नाव आहे. या यादीमध्ये शो-बिझनेसच्या विविध क्षेत्रांतील महिलांचा समावेश आहे ज्यांनी अलीकडेच उत्कृष्ट काम केले आहे. 

एसएस राजामौली यांच्या आरआरआर आणि संजय लीला भन्साळी यांच्या गंगूबाई काठियावाडीमध्ये केलेल्या कामासाठी आलियाचं प्रचंड कौतुक होत आहे. यावर आलीया म्हणाली , “एक चित्रपट नेहमीच असतो जो भाषेच्या पलीकडे जातो आणि लोकांच्या हृदयात आपली छाप सोडतो.”

तिच्या छोट्या परिचयात करण जोहरसोबतचा तिचा आगामी चित्रपट रॉकी और रानी की प्रेम कहानीचाही उल्लेख करण्यात आला आहे. यावर अलिया म्हणाली मी यासाठी प्रचंड उत्सुक आहे कारण करण जोहर बॉलीवूडला चांगलं काहीतरी देत असतात.

या यादीत HBO हिट हाउस ऑफ द ड्रॅगन - मिलि अल्कॉक, एमिली केरी, ऑलिव्हिया कुक, एम्मा डी'आर्सी, सोनोया मिझुनो या महिलांचाही समावेश आहे. या यादीत स्पॅनिश गायिका रोसालियाचाही समावेश आहे. 

या आंतरराष्ट्रीय नावांमध्ये आता आलीया भट्टचेही नाव समाविष्ट झाले आहे. अलीकडच्या तिच्या काही भूमीका या तिला एक वेगळी ओळख मिळवून देणाऱ्या होत्या.

Alia Bhatt
Sheezan Khan got Bail :"तुनिषा असती तर ती माझ्यासाठी खूप"...तुरूंगात बाहेर पडताच शीजान बोलला...

आलिया शेवटची पती रणबीर कपूरसोबत ब्रह्मास्त्रमध्ये दिसली होती. गेल्या वर्षीही ती कॉमेडी-थ्रिलर डार्लिंग्समध्ये दिसली होती. गंगूबाई काठियावाडीमध्ये तिने मुंबईतील कामाठीपुरा भागातील वेश्यालयाच्या म्होरक्या स्त्रीची भूमिका केली होती. RRR मध्ये तिची जोडी राम चरण सोबत होती आणि चित्रपटात तिची छोटी भूमिका होती.

रॉकी और रानी की प्रेम कहानीमध्ये ती रणवीर सिंगसोबत दिसणार आहे. तसेच धर्मेंद्र, जया बच्चन आणि शबाना आझमी या चित्रपटात असणार आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com