‘मी वसंतराव’ला ‘रेड कार्पेट’चा मान

मराठी सिनेमा आता आंतरराष्ट्रीय स्पर्धेत बाजी मारू शकतो का हे पाहावे लागणार आहे. या स्पर्धेसाठी सुवर्ण मयूर आणि 80 लाख रुपयांची रोख रक्कमेचे बक्षीस आहे.
‘मी वसंतराव’ला ‘रेड कार्पेट’चा मान
In 52nd IFFI honored film Mi Vasantrao Deshpande on red carpetDainik Gomantak

पणजी: आपल्या अलौकिक कर्तबगारीने हिंदुस्तानी शास्त्रीय संगीताला सर्वोच्च स्थानावर नेणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे पंडित वसंतराव देशपांडे. त्यांच्या जीवनावर आधारित ‘मी वसंतराव’ या चित्रपटाच्या संपूर्ण टीमला इफ्फीत ‘रेड कार्पेट’चा मान देण्यात आला. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे हा चित्रपट इफ्फीच्या इंडियन पॅनोरमाबरोबरच आंतरराष्ट्रीय चित्रपट स्पर्धेसाठी भारतातून निवड झालेला सिनेमा आहे. त्यामुळे मराठी सिनेमा आता आंतरराष्ट्रीय स्पर्धेत बाजी मारू शकतो का हे पाहावे लागणार आहे. या स्पर्धेसाठी सुवर्ण मयूर आणि 80 लाख रुपयांची रोख रक्कमेचे बक्षीस आहे.

In 52nd IFFI honored film Mi Vasantrao Deshpande  on red carpet
IFFI 2021: 75 क्रिएटिव्ह माईन्ड्समध्ये गोव्याचे दोन तरुण

सध्या भारतीय सिनेमांमध्ये बायोपिकची चलती आहे. यात पंडित वसंतराव देशपांडेंसारख्या दिग्गज गायकावर चित्रपट बनवणे हे मोठे आणि अवघड होते. गेली आठ वर्षे या सिनेमावर काम सुरू होते. त्यात कोरोनामुळे काही काळ गेला. प्रसिद्ध दिग्दर्शक निपुण धर्माधिकारी यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला असून यात वसंतराव देशपांडे यांचे नातू आणि गायक राहुल देशपांडे, अनिता दाते, अमेय वाघ, पुष्कराज चिरपुटकर, चिन्मय मांडलेकर यांनी अभिनय केला असून या चित्रपटाचे आज इफ्फीत प्रदर्शन झाले. याला रसिकांकडून हाऊसफुल्ल पसंती मिळाली.

In 52nd IFFI honored film Mi Vasantrao Deshpande  on red carpet
IFFI 2021: त्यांना योग्य सन्मान कधी मिळेल?

इफ्फीसारख्या आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर आपल्या सिनेमाचे प्रदर्शन होणार ही अत्यंत आनंददायी बाब आहे. या चित्रपटाचे प्रदर्शन इथे होत असल्याने मी अतिशय आनंदी आहे.

- निपुण धर्माधिकारी, दिग्दर्शक

या चित्रपटाची इफ्फीत निवड होणे हीच पंडित वसंतराव देशपांडे यांना मिळालेली आंतरराष्ट्रीय सलामी आहे. या महोत्सवात रसिकांकडून चित्रपटाला चांगली दाद मिळत आहे याचा आनंद वेगळाच आहे.

- राहुल देशपांडे, गायक आणि अभिनेता

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com