तापसी पन्नू,अनुराग कश्यप यांच्याविरोधात आयकर विभागाची छापेमारी

गोमंतक वृत्तसेवा
बुधवार, 3 मार्च 2021

तापसी समाजमाध्यमातून सतत वेगवेगळ्या विषयांवर आपली भूमिका मांडताना दिसते.

मुंबई : बॉलिवूडमधील प्रसिध्द अभिनेत्री तापसी पन्नू आणि प्रसिध्द दिग्दर्शक अनुराग कश्यप यांच्याविरोधात आयकर विभागाने छापेमारी सुरु केली. तापसी समाजमाध्यमातून सतत वेगवेगळ्या विषयांवर आपली भूमिका मांडताना दिसते. आयकर विभागाने तापसी आणि अनुराग कश्यप यांच्या मुंबईतील मालमत्तांवर छापेमारी केली आहे. अनुराग आणि तापसी यांच्यासह विकास बहल आणि मधू मंटेना यांच्याही घरी आयकर विभागाने छापेमारी केली असल्याचे सांगण्यात येत आहे.आयकर विभागाची 30 पेक्षा अधिक ठिकाणी छापेमारी सुरु आहे. आयकर काय़दा 132 नुसार ही छापेमारी सुरु आहे.

तापसी आणि अनुराग यांच्या मालमत्तांवर बुधवारी दुपारी छापे टाकले आहेत. विशेषत:हा आयकर विभागाने फॅंटम चित्रपटाशी संबंधीत लोकांच्या घरावर ही छापेमारी केली आहे. तसेच मधु मंटेना यांच्या ''क्वॉन'' कंपनीच्या कार्यलयावरही आयकर विभागाने धाड मारली आहे. आयकर चुकवल्यामुळे ही धाड घालण्यात आली असून  मुंबईतील इतर 22 ठिकाणीही छापेमारी करण्यात आली आहे. मात्र या छापेमारीवरुन राजकिय वादंग निर्माण झाली आहे.

‘टायगर’ नावाची अफलातून कहाणी; जॅकी श्रॉफ यांनी आठवणींना दिला उजाळा

फॅंटम फिल्म आणि क्वान या कंपन्यानी कराची चोरी केल्य़ाप्रकरणी ही छापेमारी करण्यात आली असल्याचे आयकर विभागाने म्हटले आहे. तसेच या करचोरी प्रकरणामध्य़े योग्य़ तो तपास सुरु असल्याचे आयकर विभागाने स्पष्ट केलं आहे. तापसी पन्नू आणि अनुराग यांच्यावर पडलेल्या आयकर विभागाच्या छापेमारीवर केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर म्हणाले, ''आयकर विभागाला ज्य़ा ही व्यक्तीच्या विऱोधात माहिती मिळते त्य़ा आधारावर आयकर विभाग आपली कारवाई सुरु करतो. त्य़ानंतर ते प्रकरण न्यायालयासमोर जाते.'' अनुराग कश्यप आणि तापसी पन्नू सतत राष्ट्रीय स्तरावरील मुद्द्यांवर आपली भूमिका मांडत आले आहेत. तापसीने केंद्र सरकारने बनवलेल्या कृषी काय़द्यांचा विरोध करत शेतकरी अंदोलनाला आपला पाठिंबा दर्शवला होता.

''एखाद ट्विट आपल्या एकतेला धक्का पोहचवू शकते, एक विनोद आपला विश्वासाला तडा घालवू शकते, एखादा टिव्ही शो आपल्या धार्मिक भावनांचं उल्लंघन करु शकतो. तर आपल्या भावनांना मजबूत करणं आवश्यक आहे.'' असं तापसीने म्हटलं होतं. 

 

संबंधित बातम्या