तापसी पन्नूच्या अडचणीत वाढ; 5 कोटींच्या रोखीची पावती जप्त

गोमन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 5 मार्च 2021

बॉलीवूड सेलिब्रिटी तप्सी पन्नू, अनुराग कश्यप यांच्या दोन फिल्म प्रोडक्शन हाऊस आणि टॅलेंट मॅनेजमेंट कंपन्यांविरूद्ध मुंबई आणि पुण्यात आयकर विभागाक़डून करण्यात आलेल्या छापेमारीच्या प्रकरणात नवीन खुलासे झाले आहेत.

मुंबई :  बॉलीवूड सेलिब्रिटी तप्सी पन्नू, अनुराग कश्यप यांच्या दोन फिल्म प्रोडक्शन हाऊस आणि टॅलेंट मॅनेजमेंट कंपन्यांविरूद्ध मुंबई आणि पुण्यात आयकर विभागाक़डून करण्यात आलेल्या छापेमारीच्या प्रकरणात नवीन खुलासे झाले आहेत. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने म्हणजेच सीबीडीटीने गुरुवारी सांगितले की एकूण 370 कोटी रुपयांचा कर चुकवल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. अंडर-व्हॅल्युएशन टॅक्स आणि शेअर व्यवहाराचे बोगस खर्च दाखवून हा कर चुकविण्यात आला आहे. या संदर्भात गुरुवारी आयकर विभागाने तापसी पन्नूच्या घरावर पुन्हा छापा टाकला. जिथे 300 कोटींचा रोख व्यवहार केल्याचा पुरावा सापडला आहे. सीबीडीटीच्या मते, या प्रॉडक्शन हाऊसने त्याच्या बॉक्स ऑफिसच्या वास्तविक उत्पन्नापेक्षा कमी उत्पन्न दाखवलं आहे.

कंगनाने दिपिकाला केलं ट्रोल; जाणून घ्या कारण

सीबीडीटी वेगवेगळ्या 28 ठिकाणी छापे मारले आहेत. यावेळी,  फिल्म प्रोडक्शन हाऊसने चित्रपटाच्या वास्तविक बॉक्स ऑफिस कलेक्शनपेक्षा कमी उत्पन्न दाखवण्याचा प्रयत्न केला. सीबीडीटीला आपल्या सर्वेक्षणात असे पुरावे मिळविले आहेत ज्यावरून असे सिद्ध होते की त्यांनी 300 कोटी रुपयांचे उत्पन्न लपविले होते.सुमारे 350 कोटी रुपयांचे उत्तर कंपनीचे अधिकारी उत्तर देऊ शकले नाहीत. 350 कोटी रुपयांच्या करामध्ये गडबड झाल्याचे पुरावे सापडले आहेत. 

Video : बॉलिवूडच्या हिरो नंबर वनची लेकीने केली कॉपी

तापसी पन्नूच्या नावावर 5 कोटींची रोकड जप्त झाली असून, त्याची चौकशी सुरू आहे. या व्यतिरिक्त 20 कोटींच्या कर घोटाळ्याचे पुरावेही सापडले आहेत. अशाच प्रकारची गडबड तप्पसी पन्नूविरूद्धही आढळली आहे. ईमेल, व्हॉट्सअॅप चॅट्स, हार्ड डिस्कच्या रूपात दोन्ही टॅलेंट मॅनेजमेंट कंपन्यांचा (फॅंटम आणि क्वान) डिजिटल डेटा हस्तगत करण्यात आला आहे. 7 बँक लॉकर सापडले आहेत. त्या ताब्यात घेण्यात आल्या आहेत. सर्च ऑपरेशन आणि तपास सतत सुरू आहे.

संबंधित बातम्या