IND vs ENG: रणवीरने विचारलं इंग्लंडला किती धावांचं टार्गेट द्यायचं? चाहते म्हणाले...

IND vs ENG: रणवीरने विचारलं इंग्लंडला किती धावांचं टार्गेट द्यायचं? चाहते म्हणाले...
IND vs ENG Ranveer Singh asked how much target should be kept so the fans said till Kohli is out

नवी दिल्ली : IND vs ENG भारत आणि इंग्लंड यांच्यात दुसरा कसोटी सामना सुरू आहे. चेन्नईत सुरू असलेल्या इंडिया आणि इंग्लंड च्या सामन्यात भारतीय संघ फलंदाजी करीत असून त्यांनी 300 धावांची आघाडी मिळविली आहे. रोहित शर्मा, चेतेश्वर पुजारा, वृषभ पंत, अजिंक्य रहाणे आणि अक्षर पटेल बाद झाले आहेत. विराट कोहली क्रीजवर खेळत आहे, आणि चांगला खेळत आहे.  भारताने 300 धावांची आघाडी मिळाली आहे. तर दुसरीकडे बॉलिवूडमधूनही या मॅचबद्दल ट्विटस येत आहेत. आता बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंगनेही यावर प्रतिक्रिया दिली आहे. रणवीर सिंगने चाहत्यांना विचारले आहे की, इंग्लंड संघाला किती धावांचं टार्गेट पुरेसे असणार आहे.

बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंगने भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसर्‍या कसोटी सामन्याबद्दल ट्विट केले आहे. “इंग्लंडसाठी किती धावांचे लक्ष्य भारताने ठेवले पाहिजे?” असा प्रश्न त्याने ट्विट करून विचारला आहे. त्यावर "कोहली आउट होईपर्यंत. इंग्लंड चांगला संघ आहे आणि त्यांच्याकडे स्टोक्स आणि रूट हे उत्कृष्ट खेळाडू आहेत. आपल्याकडे बराच वेळ शिल्लक आहे. तेव्हा ते तकापर्यंत पुढे खेळत रहा,” असे उत्तर एका चाहत्याने दिले आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Virender Sehwag (@virendersehwag)

त्याचवेळी बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंह यांच्या या प्रश्नाचे उत्तर देताना एका चाहत्याने सांगितले की, “इंग्लंड संघासाठी 400 धावा पुरे आहेत. म्हारी बॉयज कोई कम थोडी ना से..” अशा प्रकारच्या प्रतिक्रीया फॅन्स देत आहेत. 

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com