
Oscar 2023: आज सकाळी भारतीयांसाठी एक आंनदाची बातमी आली, सर्वांच्या नजरा 95 व्या अकादमी पुरस्काराकडे (95th The Academy Awards) लागल्या होत्या. यावेळी भारताला दोन ऑस्कर मिळाले आहेत.
दरम्यान, दक्षिणेतील प्रसिद्ध दिग्दर्शक एसएस राजामौली (SS Rajamouli) यांच्या 'RRR' चित्रपटातील (Movie) 'Naatu Naatu' या गाण्याला बेस्ट ऑरिजिनल सॉन्ग कॅटेगरीमध्ये ऑस्कर मिळाला, तर डॉक्युमेंट्री फिल्म 'द एलिफंट व्हिस्पर्स'ला सर्वोत्कृष्ट लघुपटाचा दुसरा ऑस्कर पुरस्कार मिळाला आहे.
तसेच, 'RRR' चित्रपटाची टीम जगातील सर्वात प्रतिष्ठित पुरस्कारांपैकी एक ऑस्कर पुरस्कार स्वीकारण्यासाठी पोहोचली होती, ज्याचे फोटो सोशल मीडियावर (Social Media) चांगले व्हायरल झाले. भारतात आतापर्यंत अनेक ऑस्कर आले आहेत, जाणून घेऊया कोणत्या स्टार्संने हा पुरस्कार जिंकला आहे...
भारताला पहिला ऑस्कर 1983 मध्ये मिळाला. डिझायनर भानू अथैया यांना 'गांधी' चित्रपटासाठी हा पुरस्कार मिळाला. भानू अथैया यांना सर्वोत्कृष्ट कॉस्च्युम डिझाइनसाठी ऑस्कर पुरस्कार मिळाला.
जर भारतातील सर्वात यशस्वी चित्रपट निर्मात्यांबद्दल बोलायचे झाल्यास, सत्यजित रे यांचे नाव सर्वात वर येईल. सत्यजित रे यांनी अनेक उत्कृष्ट चित्रपट केले, ज्यांचे परदेशातही कौतुक झाले. 1992 मध्ये सत्यजित रे यांना ऑस्कर पुरस्कार मिळाला होता.
वास्तविक, त्यावेळी सत्यजित रे खूप आजारी होते, त्यामुळे ते ऑस्कर सोहळ्याला उपस्थित राहू शकले नाहीत आणि नंतर त्यांच्यासाठी ऑस्कर ट्रॉफी कोलकाता येथे पाठवण्यात आली.
2009 साली प्रदर्शित झालेल्या 'स्लमडॉग मिलेनियर' या भारतीय चित्रपटाचीही जगभरात चर्चा झाली होती. या चित्रपटाने 3 वेगवेगळ्या श्रेणींमध्ये ऑस्कर जिंकले. रेसुल पुकुट्टीला सर्वोत्कृष्ट साउंड मिक्सिंगसाठी ऑस्कर पुरस्कार मिळाला.
एआर रहमान यांना 'स्लमडॉग मिलेनियर' चित्रपटातील 'जय हो' गाण्यासाठी ऑस्कर पुरस्कार मिळाला. रहमान यांना बेस्ट ओरिजिनल सॉन्ग आणि सर्वोत्कृष्ट ओरिजनल स्कोअरसाठी हा पुरस्कार मिळाला.
'स्लमडॉग मिलेनियर'मधील 'जय हो' हे गाणे लिहिणाऱ्या गुलजार यांना बेस्ट ओरिजिनल सॉन्गचा ऑस्कर पुरस्कार मिळाला.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.
दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.