Indian Army Day: 'या' बॉलीवुड चित्रपटांमध्ये भारतीय सैन्यांचे दाखवण्यात आले शौर्य

भारतीय जवानांचे (Indian Army) शौर्य आणि धैर्य दाखवणारे बॉलीवुड चित्रपट (Bollywood Movies) तुम्ही पाहिलेत का?
Indian Army Day
Indian Army DayDainik Gomantak

बॉलीवुडमध्ये भारतीय सैन्यांवर अनेक चित्रपट बनवण्यात आले आहेत. या चित्रपटांमध्ये (Movies) सैन्याचे शौर्य दाखवण्यात आले आहे. अशा चित्रपटांना प्रेक्षकांची पसंती देखील मिळते. चित्रपटांमधील जवानांचे शौर्य पाहून प्रेक्षणकांमध्ये भारतीय सैन्यांबद्दल अभिमानाची भावना निर्माण होते. या चित्रपटांना पाहून अनेक तरुण भारतीय सैन्यांमध्ये (Indian Army) सहभागी होण्याचा निर्णय घेतात. चला तर जाणून घेवूया अशा काही चित्रपटांबद्दल अधिक माहिती.

* शेरशहा

शेरशहा (Shershaah) हा चित्रपट परमवीर चक्र पुरस्कार सन्मानित कॅप्टन बत्रा यांच्या जीवनावर आधारित आहे. या चित्रपटामध्ये कारगिल युद्धा दरम्यान भारतीय जवनांचे धैर्य दाखवण्यात आले आहे. अनेक जवनांनी देशासाठी बलिदान दिले होते, यात विक्रम बत्रा देखील होते. या चित्रपटामध्ये सिद्धार्थ आणि कियारा अडवाणी मुख्य भूमिकेत आहेत. ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झालेला हा चित्रपट (Movie) प्रेक्षकांच्या पसंतीला पडला आहे.

* लक्ष्य

ऋतिक रोशनचा (Hrithik Roshan) 'लक्ष्य' हा चित्रपट आजसुद्धा प्रत्येकाच्या मनात देशभक्ती जगवतो. या चित्रपटामध्ये प्रीती झिंटा हृतिकसोबत मुख्य भूमिकेत दिसली होती. हा चित्रपट लेफ्टनंट करण शेरगिलवर आधारित आहे.

Indian Army Day
Neil Nitin Mukeshला जेव्हा लता मंगेशकर यांनी पहिल्यांदा हातात घेतले

* उरी: सर्जिकल स्ट्राइक

हा चित्रपट 2019 साली चित्रपटगृहात आला होता. 2016 साली पाकिस्तानच्या उरी हल्यानंतर भारतीय जवानांवर सर्जिकल स्ट्राईक करण्यात आला होता. या चित्रपटामध्ये विकी कौशल मुख्य (Vicky Kaushal ) भूमिकेत होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली.

* बॉर्डर

जेपी दत्ता यांचा हा चित्रपट 1971 च्या भारत- पाकिस्तान युद्धावर आधारित आहे. या चित्रपटामध्ये आर्मी ऑफिसर आणि सैनिकांच्या या चित्रपटात दाखवण्यात आली आहे. या चित्रपटात सनी देओल, सुनील शेट्टी, अक्षय खन्ना यांच्यासह अनेक कलाकार मुख्य भूमिकेत होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com