भारतीय सिनेमा उद्योगाने जागतिक दर्जाचे काम करावे - गोयल

pib
रविवार, 12 जुलै 2020

आक्षेपार्ह ,चुकीची माहिती देणाऱ्या, आपल्या देशाचे आणि समाजाचे वाईट पध्दतीने  चित्रण करणारे विषय, अनियंत्रित ओटीटी प्लँटफाँर्मवरून दाखवले जातात याबद्दल  चिंता व्यक्त करत, ते कुटुंबीयांसमवेत बघण्यास योग्य नाही, असे मत त्यांनी प्रदर्शित केले.

नवी दिल्ली, 

केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी आज भारतीय औद्योगिक आणि वाणिज्य महासंघाच्या अर्थात फिक्की फ्रेम्सच्या समापन सत्राला आभासी पध्दतीने संबोधित केले. भारतीय सिनेमा आणि जाहिरात उद्योगाकडे, जागतिक स्तरावर आपला ठसा उमटविण्याइतके कौशल्य आणि प्रतिभा आहे, असे गोयल यावेळी  म्हणाले. गुणवत्तेचे प्रदर्शन करून पुरस्कार प्राप्त करणे हे उद्देश असायला हवे या क्षेत्रात मोठी  गुंतवणूक आणि भांडवल भारतीय सिनेमा आणि जाहिरात आणू  शकतात.  या उद्योगाने देशाच्या सीमा ओलांडून पुढे जावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. जाहिरात क्षेत्रात अनेक सर्जनशील व्यक्ती असून त्यापैकी अनेकांनी आंतरराष्ट्रीय उत्पादनांसाठी(ब्रँन्ड्स)नेतृत्व करत आहेत. भारताने सामुग्री विकासाच्या क्षेत्रात जागतिक नेतृत्व करायला हवे.

भारतीय सिनेमा उद्योगावर, काही देशांनी आणलेल्या प्रतिबंधात्मक पध्दती आणि अडचणी,जर सरकारच्या लक्षात आणून दिल्या, तर त्या  चालवून घेतल्या जाणार नाहीत अथवा भारत त्याला तशाच पध्दतीने उत्तर देईल. एकाच खिडकीवरून,सिनेमा चित्रिकरणासाठी विविध प्रकारच्या  परवानग्या, प्रक्रिया सुलभीकरण, ऑनलाईन अधिकारीक अनुमती आणि ई गव्हर्न्सची अंमलबजावणी, ह्या उद्योगाच्या प्रामाणिक गरजा असून त्याकडे लवकरच लक्ष दिले जाण्याची आवश्यकता आहे.

भारतीय सिनेमाने,कोविड विरोधी लढाईत महत्त्वाची भूमिका बजावली असून आरोग्य विषयक सतर्कता बाळगण्याविषयी जनजागृती करण्यातही महत्त्वाची भूमिका वठविली असल्याबद्दल श्री.गोयल यांनी त्यांची प्रशंसा केली. देशातील लोकांना सहजपणे समजतील अशा सामाजिक संकल्पनांबद्दलही जागरूकता निर्माण केल्याबद्दल उद्योगाची त्यांनी स्तुती केली .सिनेमा उद्योग हा  भारताच्या मूर्त शक्तीचा समकालीन आविष्कार असून, तरुण पिढीच्या आकांक्षा त्यातून प्रतिबिंबित होतात, असे त्यांनी सांगितले. देशातील 1.35 अब्ज  लोकांना मनोरंजनाची आस असते आणि त्याची पूर्तता करायला सिनेमा उद्योग सदैव तत्पर असतो, असेही ते यावेळी म्हणाले. आत्मनिर्भर भारत, देश स्वतः स्वावलंबी होऊन  जागतिक पातळीवर सर्व देशांशी स्पर्धा करेल,असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले.

कोविड हे सध्याचे संकट असून, पूर्वी पार केलेल्या इतर संकटांप्रमाणे हे देखील पार होईल आता आपण सर्वांनी कोविड नंतरच्या विश्वात, नव्या कार्य करण्याच्या आणि जगण्याच्या नव्या पध्दती उपलब्ध होणार असून या नव्या संधींना सामोरे जाण्यासाठी आपण प्रयत्नशील राहूया. सर्वांच्या पुढे रहाण्यासाठी,वेगळ्या पद्धतीने विचार करणे गरजेचे असून, सतत नाविन्याचा शोध घ्यायला हवा.पुरेशी काळजी घेण्याची गरज असली तरी भिऊन पुढे जाता येणार नाही. आपल्याला नव्या जगाचे आज्ञापालन आणि नव्याचा अंगिकार करायला हवा.

सुमारे 25 लाख लोक प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे सिनेमा उद्योगाशी जोडलेले आहेत. त्यांनी यातील उद्योगातील सर्व घटकांची काळजी घेण्याचे आवाहन करत, कमी पगारावर काम करण्यार्यांसाठी कल्याणकारी उपाययोजना आखाव्यात, जेणेकरून याउद्योगात काम करणाऱ्या प्रत्येकाला अभिमान वाटेल असे जीवन जगता येईल, असे आवाहनही त्यांनी सांगितले.

 

संबंधित बातम्या