कोरोना योद्ध्यांसाठी 'इंडियन ओशियन'चे 'अँथेम सॉन्ग'

गोमन्तक वृत्तसेवा
शनिवार, 24 ऑक्टोबर 2020

'भारत के महावीर' या टीव्ही शोच्या माध्यमातून एक अँथम साँग सादर करुन त्यांनी कोविड-१९ च्या नायकांचा सन्मान केला आहे. "मंजिले हमसे खुद आज कहने लगीं, दिल में है हौंसला, जितेगी जिंदगी", असे त्यांनी रचलेल्या गाण्याचे बोल असून हे गाणं अगदी आवडीनं सर्व दूर ऐकलं जात आहे.

मुंबई- रॉक आणि पॉपच्या चाहत्यांसाठी एक पर्वणी ठरणारा बँड इंडियन ओशन प्रत्येकवेळी आपल्या चाहत्यांचं मन जिंकण्यासाठी तत्पर असतो. याही वेळी असंच काम करत त्यांनी आपल्या चाहत्यांनाच नाही तर सबंध भारतीयांना सुखावले आहे. 'भारत के महावीर' या टीव्ही शोच्या माध्यमातून एक अँथम साँग सादर करुन त्यांनी कोविड-१९ च्या नायकांचा सन्मान केला आहे. "मंजिले हमसे खुद आज कहने लगीं, दिल में है हौंसला, जितेगी जिंदगी", असे त्यांनी रचलेल्या गाण्याचे बोल असून हे गाणं अगदी आवडीनं सर्व दूर ऐकलं जात आहे.

या टेलिव्हिजनचे शो चे होस्ट सोनू सूद आणि दिया मिर्झा यांसह काही कोरोना योद्ध्यांना घेत त्यांनी एक व्हिडिओ केला आहे. संयुक्त राष्ट्र संघाच्या ७५ व्या वर्धापन दिनानिमित्त या गीताचे लॉन्चिंग करण्यात आले. यावेळी या बँडच्या सदस्यांनी आनंद व्यक्त करताना या नकारात्मक काळात काहीतरी सकारात्मक करण्यावर आमचा भर होता असे सांगितले. हे  गीत तयार करण्यासाठी आम्ही भारत के महावीर या कार्यक्रमाशी जोडले गेलो. आपण एकजूट होऊन या कठीण परिस्थितीवर नक्की मात करू असेही त्यांनी यावेळी म्हटले. 

'भारत के महावीर' ही मालिका असून ती तीन भागांत सादर केली जाईल. यात समन्वयतेच्या भावनांवर आधारित १२ कथा आहेत. त्याचा पहिला टप्पा डिस्कव्हरी चॅनेल आणि डिस्कवरी प्लस अ‍ॅपवर नोव्हेंबरमध्ये प्रसारित केला जाईल 

संबंधित बातम्या