गायक बिस्वजित चटर्जी यांना मिळणार इंडियन पर्सनॅलीटी ऑफ द इयर पुरस्कार  

Copy of Gomantak Banner  (8).jpg
Copy of Gomantak Banner (8).jpg

गोव्यातील 51 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ज्येष्ठ अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक, हिंदी आणि बंगाली चित्रपटांचे गायक बिस्वजित चटर्जी यांना इंडियन पर्सनॅलीटी ऑफ इयर पुरस्काराने गौरवण्यात येईल अशी माहिती प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली. मार्च 2021 मध्ये राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात हा पुरस्कार त्यांना प्रदान केला जाणार असल्याचे प्रकाश जावडेकर यांनी सांगितले.  

बीस साल बाद चित्रपटातल्या कुमार विजय सिंग,कोहरा मधल्या राजा अमित कुमार सिंग,एप्रिल फुल मधल्या अशोक,  मेरे सनम मधल्या रमेशकुमार, नाईट इन लंडन मधला जीवन, दो कलियाॅं मधल्या शेखर,आणि किस्मत  मध्ये त्यांनी साकारलेल्या  विकीच्या भूमिकेला  रसिकांची मोठी पसंती मिळाली. आशा पारेख, वहिदा रेहमान, मुमताज,माला सिन्हा आणि राजश्री या प्रख्यात अभिनेत्रीसमवेत त्यांनी चित्रपटात भूमिका केल्या. त्यांच्या बंगाली चित्रपटांमध्ये चौरीन्घी (1968), उत्तम कुमार यांच्यासमवेत गढ नसीमपूर, कुहेली आणि त्यानंतर श्रीमान पृथ्वीराज (1973),जय बाबा तारकनाथ (1977)  आणि अमर गीती  (1983) यांचा समावेश आहे. 

1975 मध्ये बिस्वजीत यांनी ‘कहते है मुझको राजा’ या चित्रपटाची निर्मिती आणि दिगदर्शन त्यांनी केले. अभिनय आणि दिग्दर्शनाबरोबरच गायक आणि निर्माता म्हणूनही त्यांनी  काम केले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com