Dalip Tahil: बॉलिवूडमधील दमदार अभिनेता दलीप ताहिल; जाणून घ्या ताहिल यांच्याबद्दल खास गोष्टी

दलीप ताहिल आज त्यांचा 70 वा वाढदिवस साजरा करत आहेत.
Dalip Tahil
Dalip TahilDainik Gomantak

आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांना खिळवून ठेवणाऱ्या दलीप ताहिल यांचे नाव हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वोत्कृष्ट अभिनेत्यांमध्ये घेतले जाते. दलीप ताहिल आज त्यांचा 70 वा वाढदिवस साजरा करत आहेत. दलीप ताहिल यांनी आपल्या अभिनयाच्या प्रवासात एकापेक्षा एक हिट चित्रपटात काम केले आहे. आज दलीप ताहिल यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या बद्दलच्या काही खास गोष्टी जाणून घेऊयात.

Dalip Tahil
Goa Football Association: गोवा फुटबॉल असोसिएशनच्या अध्यक्षपदी कायतान फर्नांडिस

अलिगडमधून शिक्षण

दलीप ताहिल यांचे शिक्षण नैनितालच्या शेरवुड कॉलेजमधून पूर्ण केले. त्यानंतर उच्च शिक्षणासाठी दलीप अलीगड मुस्लिम विद्यापीठात गेले. तेथून शिक्षण पूर्ण करून कामाच्या शोधात ते मुंबईत आले.

बराच काळ रंगभूमीवर काम

दलीप ताहिल यांनी बराच काळ रंगभूमीवर काम केले. दलीप ताहिल यांना शालेय जीवनापासूनच अभिनयाची आवड होती. दलीप ताहिल शाळेपासूनच नाटकात काम करायचे. ताहिल थिएटरचे एक अतिशय प्रगल्भ कलाकार आहेत.

Dalip Tahil
Somalia Bombings: सोमालियामध्ये भीषण बॉम्बस्फोट; 100 ठार, 300 जखमी

दलीप ताहिल यांनी 1974 साली 'अंकुर' या चित्रपटाद्वारे फिल्मी दुनियेत पदार्पण केले. सहा वर्षांनंतर आलेल्या रमेश सिप्पी यांच्या 'शान' या चित्रपटात केलेल्या नकारात्मक भूमिकेतून त्यांना ओळख मिळाली. शानमध्ये अभिनयाची जादू दाखवल्यानंतर या कलाकराने कधीच मागे वळून पाहिले नाही.

दलीप ताहिल यांनी त्यांच्या देदीप्यमान कारकिर्दीत 'शक्ती', 'त्रिदेव', 'बाजीगर', 'सैनिक', 'इश्क', 'चोरी चोरी चुपके चुपके', 'भाग मिल्खा भाग' आणि 'मिशन मंगल' या सारख्या अनेक चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाची जादू दाखवली आहे. दलीप ताहिल अजूनही चित्रपटसृष्टीत सक्रिय आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com