अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांचे इन्स्टाग्रॅम अकाऊंट हॅक

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 17 डिसेंबर 2020

 अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांचे इन्स्टाग्रॅम अकाऊंट हॅक करण्यात आले आहे. त्यांनी याबाबतची तक्रार सायबर पोलिसांकडे नोंदविली आहे.

मुंबई :  अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांचे इन्स्टाग्रॅम अकाऊंट हॅक करण्यात आले आहे. त्यांनी याबाबतची तक्रार सायबर पोलिसांकडे नोंदविली आहे.

 इन्स्टाग्रॅमवरील एका डीएमला प्रतिसाद दिल्यानंतर त्यांचे इंस्टाग्राम अकाऊंट हॅक झाल्याची माहिती मातोंडकर यांनी ट्विटरवरुन दिली. “माझे इंस्टाग्राम अकाउंट इंस्टाग्राम हॅक झाले आहे. आधी ते आपल्याला डीएम करून अकाऊंट व्हेरिफाय करण्यास सांगतात आणि नंतर ते हॅक होतं. #NotDone,.” अशा आशयाची पोस्ट त्यांनी ट्विटरद्वारे शेअर केली. दरम्यान, ४६ वर्षीय अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी नुकताच शिवसेनेत प्रवेश केला असून, शिवसेनेतर्फे त्यांचे नाव राज्यपाल नियुक्त विधान परिषद सदस्यांच्या यादीत देण्यात आले आहे.
 

अधिक वाचा :

पॉर्न स्टारची कशी झाली सुपरस्टार शकीला ?

 

संबंधित बातम्या