ट्विटरनंतर इन्स्टाची कंगनावर कारवाई;पोस्ट केली डिलीट

दैनिक गोमंतक
रविवार, 9 मे 2021

मला वाटत नाही एका आठवड्यापेक्षा जास्त काळ मी इन्स्टाग्रामवर टिकू शकेन.

बॉलिवूडमधील प्रसिध्द अभिनेत्री कंगना रणावत (Kangana Ranaut) खळबळजनक वक्तव्यासाठी ओळखली जाते. कंगनावर नुकतीच ट्विटरने कारवाई केली आहे. कंगनाच ट्विटर आकाऊंट (Twitter Account) सस्पेंड करण्यात आलं आहे. त्यानंतर कंगनाने इन्स्टाग्रामवरुन (Instagram) वक्तव्य करण्यास सुरुवात केली होती. मात्र आता इन्स्टाग्रामनं देखील कंगनाची पोस्ट डिलीट केली आहे. त्यामुळे आता इन्स्टाग्रामवरुनही कंगनाचा पत्ता कट होणार का? अशा चर्चा रंगू लागल्या आहेत. (Instagrams action on Kangana after Twitter posted deleted)

कंगनाने नुकतीच इन्स्टाग्रामवरुन आपल्याला कोरोनाची लागण झाली असल्याची पोस्ट शेअर केली होती. मात्र इन्स्टाग्रामने कंगनाची पोस्ट डिलीट केली आहे. इन्स्टाग्रामने कंगनावर कारवाई केल्यानंतर कंगनाने इन्स्टाग्रामवर आगपखड करण्यास सुरुवात केली होती. 

अभिनेत्री कंगना रणावतला कोरोनाची लागण

कंगानने इन्स्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये ती म्हणते, ‘’इन्स्टाग्रामने माझी पोस्ट डिलीट केली आहे, ज्यामध्ये मी कोरोनाचा नायनाट करेन अशी धमकी दिली होती. यात कुणाच्या भावना दुखावल्या. म्हणजे कम्युनिस्ट आणि दहशतवाद्यांबद्दल सहानुभूती बाळगणारे ट्विटरवर पाहिले होते, मात्र कोव्हिड फॅन क्लब. कमाल आहे. इन्स्टावर दोन दिवस झाले आहेत. मला वाटत नाही एका आठवड्यापेक्षा जास्त काळ मी इन्स्टाग्रामवर टिकू शकेन,’’ अशी पोस्ट करत कंगनाने इन्स्टाग्रामवरच टिका केली.

कंगनाची इन्स्टाग्रामवरील पोस्ट आता चांगलीच व्हायरल होत आहे. कंगनाने इन्स्टाग्राम पोस्ट करत तिला कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती दिली होती. स्वत:चा फोटो शेअर तिने ‘’मागील काही दिवसांपासून माझ्या डोळ्यांची जळजळ होत होती आणि अशक्तपणाही जाणवत होता. मी हिमाचल प्रदेशला (Himachal Pradesh) जाण्याचा विचार केला होता म्हणून मी कोरोनाची टेस्ट (Corona Positive) कोली होती. आज सकाळी माझा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर मी स्वत:ला होमक्वारंटाइन करुन घेतलं होतं. मला माहिती नाही कोरोनाचे विषाणू माझ्या शरीरामध्ये पार्टी करत असतील. परंतु मी त्यांना संपवून टाकेन.

सुशांत सिंह राजपूत प्रकरणात गोव्यातून एकाला अटक

आपल्यावर कोणत्याही शक्तीच्या परिणाम होऊ देऊ नका. जर तुम्ही कोरोनाला घाबरलात तर तो तुम्हाला अजून जास्त घाबरवेल. चला कोरोनाला समूळ नाश करुन टाकूयात. हे काही नसून थोड्या कालावधीसाठी येणारा ताप आहे. मात्र त्याकडे जास्त लक्ष दिलं गेलं. आता तो काही लोकांना होतेय. हरहर महादेव’’ असं तिने कॅप्शनमध्ये म्हटलं होतं,’’ अशी पोस्ट कंगनाने केली होती.

गेल्या काही दिवसांपासून कंगना समाजमाध्यमातून अनेक विषयांवर अगदी परखडपणे मते मांडत होती. कंगनाने एवढ्यावर न थांबता अमेरिकेसह (America) इतर देशांवर देखील निशाणा साधला आहे. यानंतर बंगाल निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर केलेल्या ट्विटमुळे ती पुन्हा एकदा चर्चेत आली होती. यानंतर कंगनाचं ट्विटरने वारंवार नियामांच भंग केल्याप्रकरणी तिचं आकाऊंट कायमच बंद करण्यात आलं असल्याचं ट्विटरने जाहीर केलं.

संबंधित बातम्या