'१४ वर्षांची असताना माझ्यावर लैंगिक अत्याचार झाले'

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 2 नोव्हेंबर 2020

मी मित्रांबरोबर बाहेर न जाता दिवस दिवस झोपून असायचे. मी कायम गर्दीत असूनही स्वत:ला कायम एकटीच समजत होते. त्यानंतर एक वेळ आली जिथे मी स्वत: नैराश्यात असल्याचे मला जाणवले.    

मुंबई- या काळात सोशल मीडियावर बॉलिवूड सेलिब्रिटी मोठ्या प्रमाणावर सक्रिय असतात. त्यात प्रसिद्ध अभिनेता आमिर खान याची मुलगी इरा खानचाही समावेश आहे. आपल्या चाहत्यांच्या मनोरंजनासाठी ती दररोज पोस्ट करत असते. मागेच जागतिक मानसिक स्वास्थ दिनाच्या दिवशी एक व्हिडीओ शेअर केला होता. त्यात तिने आपणही याआधी नैराश्यामध्ये असल्याचे म्हटले होते. मात्र, या मागे नेमके कारण काय होते हे तिच्या चाहत्यांना समजत नव्हते. या प्रश्नाचे उत्तर तिने अखेर दिले आहे. 14 वर्ष वय असताना तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचा स्फोटक खुलासा तिने केला आहे.  

इन्टाग्रॅम वर इराने व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्यात आपल्या नैराश्याचे कारण सांगताना ती म्हणाली की, खूप लहान असताना माझ्या पालकांना घटस्फोट झाला होता. पालकांनी माझ्या सर्व इच्छांची पूर्ती केली. परंतू त्या घटनेने माझ्यावर खूप मोठा परिणाम केला होता. माझे वय सहा वर्ष असताना मला क्षयरोग झाला होता. त्यानंतर मी १४ वर्षांची असताना माझ्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आले होते. अशा अनेक छोट्या छोट्या घटनांमुळे माझ्या आयुष्यावर परिणाम होत होता. मी मित्रांबरोबर बाहेर न जाता दिवस दिवस झोपून असायचे. मी कायम गर्दीत असूनही स्वत:ला कायम एकटीच समजत होते. त्यानंतर एक वेळ आली जिथे मी स्वत: नैराश्यात असल्याचे मला जाणवले.    

संबंधित बातम्या