Ira Khan Wedding: आमिर खानची लेक लवकरच चढणार बोहल्यावर

Ira Khan Wedding: आमिर खान देखील आपल्या लाडक्या लेकीच्या लग्नासाठी उत्सुक असल्याचे दिसून येत आहे.
Ira Khan
Ira Khan Dainik Gomantak

Ira Khan Wedding: बॉलीवूडचे कलाकार या ना त्या कारणाने सातत्याने चर्चेत असतात. कधी त्यांच्या प्रोफेशनल लाइफमुळे तर कधी त्यांच्या पर्सनल लाइफमुळे ते चर्चेत असतात. कधी हे बॉलीवूड स्टार त्यांच्या मुलांमुळे चर्चेत असतात.

आता आमिर खानची लेक आइरा खान लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. काही दिवसांपूर्वीच तिचा नुपुर शिखरे बरोबर साखरपुडा केल्याचे पाहायला मिळाले होते. ३ ऑक्टोबरला आइरा आणि नुपुर लग्नगाठ बांधतील. मिळालेल्या माहीतीनुसार, हा विवाहसोहळा उदयपूर मध्ये पार पडणार आहे. आमिर खान देखील आपल्या लाडक्या लेकीच्या लग्नासाठी उत्सुक असल्याचे दिसून येत आहे.

Ira Khan
Rekha: रेखानं चाहत्याला मारले? लोक म्हणतात- 'आता तो महिनाभर...'

२६ वर्षाची आइरा आमिर खान आणि रिना दत्ता यांची मुलगी आहे. यापूर्वी दिलेल्या एका मुलाखतीत तिने नुपुरबरोबर कशी ओळख झाली हे सांगितले आहे. ती म्हणते, मी १७ वर्षाची असताना एक जीम जॉइन केले होते. तेव्हा नुपुरने मला ट्रेनिंग द्यायला सुरुवात केली. हळूहळू आमची मैत्री झाली आणि त्याचे प्रेमात रुपांतर झाले असे तिने म्हटले होते.

दरम्यान, या लग्नात कुटुंबीय आणि मित्रपरिवार उपस्थिती लावणार आहे. मिळालेल्या माहीतीनुसार, बॉलीवूड इंडस्ट्रीमधील कोणीही या सोहळ्यात हजर असणार नाही. आइरा सोशल मिडियावर चांगलीच अॅक्टिव्ह असते. आपल्या दररोजच्या आयुष्यातील अनेक गोष्टी ती आपल्या चाहत्यांबरोबर शेअर करताना दिसते. नुपुरबरोबचे अनेक फोटो ती शेअर करत असते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com