"इरफान पठाण दक्षिणात्य सुपरस्टार विक्रमसोबत अभिनय करताना दिसणार"

गोमन्तक वृत्तसेवा
शनिवार, 9 जानेवारी 2021

भारतीय संघातील माजी अष्टपैलू खेळाडू इरफान पठाणने अभिनय क्षेत्र आजमावत आहे.'कोब्रा'चित्रपटातून इरफान रुपेरी पडद्यावर अभिनयाची छाप पाडताना दिसणार आहे

चेन्नई: भारतीय संघातील माजी अष्टपैलू खेळाडू इरफान पठाणने अभिनय क्षेत्र आजमावत आहे.'कोब्रा'चित्रपटातून इरफान रुपेरी पडद्यावर अभिनयाची छाप पाडताना दिसणार आहे.या चित्रपटात दक्षिणात्य सुपरस्टार विक्रमसोबत आगामी चित्रपटात अभिनय करताना दिसणार आहे.व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी इरफान पठाणच्या कोब्रा चित्रपटाचा टिझर शेअर केला आहे.

आदर्श यांनी टिझर प्रदर्शीत करत इरफान आणि विक्रम कोब्रा चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहेत असं सांगितलं.कोब्रा तमिळ चित्रपट आहे.इरफान आणि विक्रम या जोडीला रुपेरी पडद्यावर पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.या चित्रपटाला म्यूझिक प्रसिध्द संगीतकार ए.आर रेहमान यांनी दिलं आहे.मात्र या चित्रपटाच्या प्रदर्शनाची  तारीख अद्याप स्पष्ट झालेली नसल्यामुळे चाहत्यांना उत्सुकता लागली आहे.

संबंधित बातम्या