'नाही विसरू शकलो तुमचा वाढदिवस'.. 'इरफान खान'च्या वाढदिवसानिमित्त मुलाने लिहिली भावनिक पोस्ट

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 7 जानेवारी 2021

दिवंगत अभिनेता 'इरफान खान'चा आज वाढदिवस. यानिमित्त त्यांचा मुलगा बाबिलनी एक भावनिक पोस्ट शेअर केली.

मुंबई :  दिवंगत अभिनेता 'इरफान खान'चा आज वाढदिवस. यानिमित्त त्यांचा मुलगा बाबिलनी एक भावनिक पोस्ट शेअर केली. त्यानी इरफान खान, त्यांची पत्नी सुतापा सिकदार आणि लहान भाऊ अयानचा व्हिडीओ शेअर करताना, तुमही वाढदिवस साजरा करण्यावर कधी विश्वास ठेवला नाही, पण यावेळी प्रयत्न करूनही आम्ही तुमचा वाढदिवस विसरू शकलो नाही, असं म्हटलं आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Babil (@babil.i.k)

 

व्हिडिओ शेअर करताना बाबिलने लिहिले की, “आपण कधीही 'कॉन्ट्रॅक्चुअल लग्न' किंवा वाढदिवसासारख्या गोष्टींवर विश्वास ठेवला नाही. कदाचित, म्हणूनच कोणाचाही वाढदिवस मला आठवत नाही, ना तुम्ही माझा वाढदिवस कधी लक्षात ठेवला, ना मला तुमचा लक्षात ठेवण्यासाठी प्रवृत्त केलं. तुम्ही कायम कामात व्यस्त असायचा, आणि फक्त वाढदिवस नाही, तर प्रत्येक दिवस सेलिब्रेट करायचो. दरवर्षी आई आम्हा दोघांना तुमच्या वाढदिवसाची आठवण करून द्यायची, पण यावर्षी आम्ही तुमचा वाढदिवस नाही विसरू शकलो." वयाच्या 54 व्या वर्षी कोलन इन्फेक्शनमुळे इरफान खानचं 29 एप्रिल 2020 ला निधन झालं होतं.

संबंधित बातम्या