इरफान खान यांच्या मुलाचे सिनेसृष्टीत पदार्पण

 इरफान खान यांच्या मुलाचे सिनेसृष्टीत पदार्पण
irrfan khan son

बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा निर्मित 'बुलबुल' हा चित्रपट गेल्या वर्षी प्रेक्षकांना पाहायला मिळाला होता. आता अनुष्काचा  एक नवीन चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या पाहायला मिळणार आहे. अनुष्का शर्मा  निर्मित असलेल्या या चित्रपटाचे नाव ''काला''असे असणार आहे. विशेष बाब म्हणजे या चित्रपटातून एक नवीन चेहरा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. हा अभिनेता म्हणजे इरफान खानचा मुलगा बाबील असल्याच्या सध्या चर्चा रंगत आहेत. अनुष्का शर्मा इरफान खानच्या मुलाला म्हणजेच बाबील याला लाँच करणार आहे. general

इरफान खानने त्यांच्या संपूर्ण आयुष्यात बॉलिवूडच नाहीतर हॉलिवूडमध्येही अनेक हिट सिनेमे दिले होते. मात्र गेल्या वर्षीच इरफान खान यांचे कॅन्सरच्या आजाराने निधन झाले होते. त्यांच्या निधनाने हिंदी चित्रपट सृष्टीने एक चांगला कलाकार गमावला.इरफान खान यांचा अभिनय सर्वांना अतिशय वास्तवादी वाटायचं. पण आता त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून चित्रपटसृष्टीत पदार्पण करण्याचा विचार त्यांच्या मुलाने केला आहे.  बाबीलला अभिनेता बनायचे आहे असे त्याने काही महिन्यांपूर्वीच जाहीर केले होते. त्यामुळे आता त्याला चित्रपटात काम करण्याची सुवर्णसंधी अनुष्का शर्माने दिली आहे.

बाबील काम करणार असणाऱ्या 'काला' या चित्रपटाचे सध्या काश्मीरमध्ये चित्रीकरण सुरु आहे. बाबीलसोबत या चित्रपटात तृप्ती डिमरी मुख्य भूमिकेत दिसणार आहे. तृप्तीला 'बुलबुल' या चित्रपटामुळे लोकप्रियता मिळाली होती. बाबील खान ने यापूर्वी 'करीब करीब सिंगल' या चित्रपटाच्या टिममध्ये असिस्टंट म्हणून काम केले होते. यासोबतच अनेक नाटकांच्या ग्रुपमध्येही बाबील सक्रिय असतो. सोशल मीडियावरही तो मोठ्या प्रमाणात फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असतो. त्यामुळे आता बाबील त्याच्या या आगामी चित्रपटात कोणत्या भूमिकेत प्रेक्षकांच्या समोर येईल हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

दरम्यान, अभिनेते इरफान खान यांनी सलाम बॉबे या चित्रपटातून आपल्याला चित्रपट करियरला सुरुवात केली होती. त्यांनतर, त्यांनी अनेक लोकप्रिय चित्रपटात काम करून आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला. 6 वेळा इरफान खान यांनी फिल्मफेयर अवॉर्ड मिळवला होता. आता त्यांचा मुलगा चित्रपटसृष्टीत पदार्पण करतोय तो कशापद्धतीने आपल्या अभिनयाची छाप प्रेक्षकांवर टाकतो याकडे सर्वांचं लक्ष असणार  आहे.   

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com