Pathan Controversy : 'बेशरम रंग' एका जुन्या गाण्याची कॉपी? पाकिस्तानी गायकाचा व्हिडीओ व्हायरल...

शाहरुख खानच्या 'पठाण' चित्रपटाच्या गाण्यावरुन आता नवा वाद उद्भवला आहे.
Pathan Controversy | Besharam Rang Song Controversy
Pathan Controversy | Besharam Rang Song Controversy Dainik Gomantak

अभिनेता शाहरुख खानचा (Shah Rukh khan) पठाण चित्रपट गेल्या कित्येक दिवसांपासुन वादात अडकला आहे. या चित्रपटातल्या बेशरम रंग या गाण्याने सुरूवातीपासुनच वाद ओढावुन घेतला आहे. या गाण्यावर काही हिंदुत्ववादी संघटनांनी धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप केला आणि मोठा वाद निर्माण झाला.

या गाण्यावरुन देशभरात गोंधळ सुरू असताना आता या वादात एका नव्या वादाची भर पडली आहे. 'सज्जाद अली' या पाकिस्तानी गायकाने पठाण चित्रपटातलं 'बेशरम रंग' हे गाणं माझ्या एका जुन्या गाण्याची कॉपी असल्याचे संकेत दिले आहेत .

बेशरम रंग आणि एकुणच पठाण चित्रपटावर रिलीज होण्याआधीपासुन मोठ्या प्रमाणात वाद सुरू आहेत. हिंदु आणि काही मुस्लीम संघटनांनीही या चित्रपटावर आक्षेप नोंदवला आहे. यानंतर सेन्सॉर बोर्डानेही गाण्यात काही बदल करुन रिलीज करण्याआधी तो सेन्सॉर बोर्डाला दाखवण्यात यावा अशी सुचना केली होती.

आपली संस्कृती आणि सभ्यता याचे भान आपण ठेवायला हवं असंही सेन्सॉर बोर्डाने म्हटलेलं आहे. हा सगळा वाद सरतो न सरतो तोच आता नवा वाद निर्माण झाला आहे.'बेशरम रंग'च्या गाण्यावरच थेट कॉपी झााल्याचा आरोप केल्यामुळे आता नवाच वाद निर्माण झाला आहे.

Pathan Controversy | Besharam Rang Song Controversy
Sushant Singh Rajput Viral Video: सुशांत सिंह राजपूतच्या फ्लॅटला 2.5 वर्षांपासून मिळेना भाडेकरू; मालकाने ठेवली 'ही' अट

गायक 'सज्जाद अली' याने थेट 'बेशरम रंग' या गाण्याचा उल्लेख केला नसला तरी त्याचा रोख कुठे आहे हे त्याच्या व्हिडीओतुन समजु शकते. इन्स्टाग्रामवर (Instagram) शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये त्याने हे गाणं ऐकुन मला माझ्या जुन्या गाण्याची आठवण झाली असं म्हटलं आहे.

या व्हिडीओत त्याने आपलं 26 वर्षांपुर्वीतचं जुनं 'अबके बिछडे हम' हे गाणं ऐकवलं. यानंतर काही युजरनी हे गाणं 'बेशरम रंग' या गाण्यासारखं असल्याचं म्हटलं आहे.तर काही युजर हे कॉपी असल्याच्या मुद्द्यावर सहमत नसल्याचं मत मांडलं आहे. हे कॉपी आहे किंवा नाही हे सांगणं सध्या शक्य नसलं तरी 'पठाण' यानिमीत्ताने पुन्हा एकदा चर्चेत आला आहे हे नक्की.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com