Jacqueline Fernandez Money Laundering : जॅकलिनच्या 'मनी लाँड्रिंग' प्रकरणी दिल्लीच्या कोर्टात सुनावणी सुरू

Jacqueline Fernandez Money Laundering : जॅकलिन फर्नांडिसच्या जामीन अर्जावर आज दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टात सुनावणी सुरू आहे.
Jacqueline Fernandez Money Laundering | Sukesh Chandrasekhar and Jacqueline Fernandez
Jacqueline Fernandez Money Laundering | Sukesh Chandrasekhar and Jacqueline FernandezDainik Gomantak

Jacqueline Fernandez Money Laundering : अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसच्या अडचणी काही केल्या कमी होण्याचे नाव घेत नाहीत. सुकेश चंद्रशेखरशी संबंधित 200 कोटी रुपयांच्या मनी लाँड्रिंग प्रकरणातील आरोपी अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसच्या जामीन अर्जावर आज दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टात सुनावणी सुरू आहे.

न्यायालयाच्या सुनावणीपूर्वी आज सकाळी जॅकलिन फर्नांडिस पटियाला हाऊस कोर्टात हजर झाली. सध्या जॅकलिन अंतरिम जामिनावर असून ईडीला आज न्यायालयात उत्तर दाखल करायचे आहे. या प्रकरणातील सुनावणीशी संबंधित सर्व ताजे अपडेट्स काय आहेत हे जाणून घेऊया. (Jacqueline Fernandez Money Laundering)

Jacqueline Fernandez Money Laundering | Sukesh Chandrasekhar and Jacqueline Fernandez
Tricks For Sharp Brain : मेंदू तीक्ष्ण करण्यासाठी 'या' सवयी ठरतात वरदान; घ्याल सर्वोत्तम निर्णय

सुनावणी सुरू झाल्यावर न्यायालयाने ईडीच्या वकिलाला या प्रकरणाशी संबंधित कागदपत्रे सादर करण्यास सांगितले. यावर ईडीच्या वकिलांनी सांगितले की, आम्ही या प्रकरणाशी संबंधित सर्व आरोपींना कागदपत्रे देऊ. कागदपत्रे ईमेलद्वारे देखील पाठविली जातील. त्यावर न्यायालयाने पुन्हा विलंब न लावता सर्व कागदपत्रे पाठवण्याचा निर्देश दिला आहे.

मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी न्यायालयात सुनावणी सुरू झाली आहे. ईडीच्या वकिलाने सांगितले की, आम्ही या प्रकरणाशी संबंधित सर्व कागदपत्रे आरोपीकडे सोपवली आहेत.

पटियाला हाऊस कोर्टाने सांगितले की, आम्ही लवकरच या प्रकरणाची सुनावणी सुरू करू. कोर्टात आज 10.30 वाजता सुनावणी सुरू झाली आहे. कोर्टाने या प्रकरणातील आरोपी पिंकी इराणीच्या वकिलाला विचारले की, तुमच्याकडे सर्व कागदपत्रांची प्रत आहे का? पिंकी इराणी याच प्रकरणातील आणखी एक आरोपी आहे. त्याबरोबर मनी लाँड्रिंग प्रकरणात आरोपी अभिनेत्री जॅकलिन कोर्टात हजर झाली.

कथित ठग सुकेश चंद्रशेखरशी संबंधित 200 कोटी रुपयांच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात कोर्टाने अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसला सोमवारी अंतरिम जामीन मंजूर केला होता. याच सुनावणीदरम्यान न्यायालयाने अभिनेत्रीच्या नियमित जामीन याचिकेवर अंमलबजावणी संचालनालयाकडून (ईडी) उत्तरही मागवले होते.

जॅकलिन फर्नांडिसने स्वत:ला परिस्थितीचा बळी असल्याचा दावा केला आहे. श्रीलंकन ​​नागरिक जॅकलीन फर्नांडिसने तिच्या नियमित जामीन अर्जात म्हटले आहे की ती 2009 पासून भारतात कर भरत आहे आणि तिची व्यावसायिक ओळखपत्रे आणि भविष्यातील काम या देशाशी निगडीत आहे. प्रिव्हेन्शन ऑफ मनी लाँडरिंग अॅक्ट (PMLA) च्या संबंधित कलमांतर्गत पाच वेळा स्टेटमेंट नोंदवण्यात आले आहे.

जॅकलिनच्या याचिकेत म्हटले आहे की, न्यायालयाने तिला दिलेल्या परवानगीच्या अटींनुसार तिने परदेशात प्रवास केला आहे आणि सर्व अटींचे पालन केले आहे. ती जानेवारी 2021 मध्ये पहिल्यांदा सुकेश चंद्रशेखरला भेटली होती आणि ती 'परिस्थितीची बळी' ठरली, असे त्यात म्हटले आहे.

ती मुख्य आरोपी सुकेश चंद्रशेखर आणि त्याच्या साथीदाराने केलेल्या गुन्हेगारी कृत्यांचा आणखी एक बळी आहे, ज्यांनी त्यांच्या खऱ्या ओळखीबद्दल वारंवार खोटे सांगितले आणि तिला आणि तिच्या कुटुंबीयांना महागड्या भेटवस्तू देऊन त्यांना फसवले, असे याचिकेत म्हटले आहे. याबाबत ते सर्व पैसे अवैध असल्याचे आपल्याला काहीच माहीत नव्हते असे अभिनेत्री जॅकलिनने सांगितले.

तत्पूर्वी, 31 ऑगस्ट रोजी न्यायाधीश प्रवीण सिंग यांनी अंमलबजावणी संचालनालयाने दाखल केलेल्या पुरवणी आरोपपत्राची दखल घेत जॅकलिनला न्यायालयात हजर राहण्यास सांगितले होते. या प्रकरणाच्या तपासासंदर्भात अंमलबजावणी संचालनालयाने तिला अनेकदा चौकशीसाठी बोलावले होते.

पुरवणी आरोपपत्रात प्रथमच आरोपी म्हणून तिचे नाव नोंदवण्यात आले आहे. ईडीच्या पहिल्या आरोपपत्रात आणि पुरवणी आरोपपत्रात तिचा आरोपी म्हणून उल्लेख नव्हता. मात्र, जॅकलीन फर्नांडिस आणि अभिनेत्री नोरा फतेही यांच्या वक्तव्याचा तपशील कागदपत्रांमध्ये नमूद करण्यात आला होता.

ईडीच्या म्हणण्यानुसार, जॅकलिन फर्नांडिस आणि फतेही यांना चंद्रशेखरकडून आलिशान कार आणि इतर महागड्या भेटवस्तू मिळाल्या होत्या, त्या संदर्भात त्यांची चौकशी करण्यात आली. ईडीने सांगितले की जॅकलीन फर्नांडिसचे 30 ऑगस्ट आणि 20 ऑक्टोबर 2021 रोजी जबाब नोंदवण्यात आले होते, ज्यामध्ये तिने चंद्रशेखरकडून भेटवस्तू घेतल्याचे मान्य केले होते. याबाबत पुढील सुनावणी अद्याप सुरू आहे. (Jacqueline Fernandez Money Laundering)

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com