'पानी पानी' वर जॅकलिनचे ठुमके

दैनिक गोमंतक
गुरुवार, 10 जून 2021

जॅकलिनने नुकताच सोशल मिडियावरील इन्स्टाग्रामवरुन पानी पानी या गाण्यावरील डान्सचा व्हिडिओ शेअर केला आहे.

बॉलिवूड (Bollywood) मधील प्रसिद्ध अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिझ (Jacqueline Fernandez) तिच्या अदाकारीने नेहमीच चर्चेत असते. जॅकलिन आणि बादशहा (Badshah) यांचे 'पानी पानी'(pani pani song) हे गाणे नुकतेच रिलीज झाले. हे गाणे सोशल मिडियावर (social media) धूमाकूळ घालत आहे. जॅकलिनने नुकताच सोशल मिडियावरील इन्स्टाग्रामवरुन पानी पानी या गाण्यावरील डान्सचा (dance) व्हिडिओ शेअर केला आहे, जो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. जॅकलिनच्या अफलातून डान्सच्या या व्हिडिओवर चाहत्यांच्या   प्रतिक्रिया येत आहेत.(Jacquelines grin on Pani Pani)

के. एल राहुल आणि अथिया इंग्लंडमध्ये एकत्र; फोटो होतोय व्हायरल

व्हिडिओमध्ये जॅकलिनच्या डान्स करतानाच्या हालचाली आश्चर्यकारक आहेत. या व्हिडिओत जॅकलिनबरोबर तिचा आवडता नृत्यदिग्दर्शक देखील दिसला आहे. जॅकलिनच्या या डान्सच्या व्हिडिओबद्दल एक खास गोष्ट म्हणजे फक्त एका तासामध्ये या व्हिडिओला 3 लाखाहून अधिक लोकांनी पाहिला आहे.  सोशल मीडियावर जॅकलिन फर्नांडिजची तुफान फॅन फॉलोइंग आहे.

इन्स्टाग्रामवर जॅकलिन फर्नांडीजच्या  52 दशलक्षाहून अधिक लोक फॉलो करत आहेत. आगामी वर्षात जॅकलिन लवकरच सलमान खान(Salman Khan) सोबत ''किक 2'(Kick 2) या सिनेमात दिसणार आहे , 'भूत पोलिस 'तसेच दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या (Rohit Shetty) 'सर्कस', आणि 'बच्चन पांडे'  या चित्रपटांमध्येही दिसणार आहे. जॅकलिन फर्नांडिजने हाऊसफुल 3,(Housefull 3) रेस 3, ड्राइव्ह, रॉय आणि ब्रदर्स यासारख्या चित्रपटांमधील तिच्या अभिनय कौशल्यामुळे तिला विशेष असं ओळखले जाते . नेटफ्लिक्सवरील थ्रिलर मिसेस किलर या वेबसिरीजमध्ये ती दिसली होती.

संबंधित बातम्या