जपानी चित्रपट ‘रिंग वॉन्डरींग’, 52 व्या इफ्फीमध्ये ठरला सुवर्ण मयूर पुरस्काराचा मानकरी

निराशेच्या जीवघेण्या थंडीत आशेचा दीप लावण्याची प्रेरणा देणाऱ्या, झेकोस्लावियाचा दिग्दर्शक व्हॅक्लाव्ह कद्रन्का यांच्या 'सेव्हिंग वन हू इज डेड' चित्रपटाला रौप्य मयूर पुरस्कार
गोल्डन पिकॉक पुरस्कार देताना डॉ प्रमोद सावंत
गोल्डन पिकॉक पुरस्कार देताना डॉ प्रमोद सावंतdainik Gomantak

विस्मृतीत गेलेल्या टोकियोमधील युद्धग्रस्त भूतकाळाच्या आठवणींना उजाळा देणारा जपानी चित्रपट ‘रिंग वॉन्डरींग’, 52 व्या इफ्फीमध्ये (IFFI) ठरला सुवर्ण मयूर पुरस्काराचा मानकरी ठरला. निराशेच्या जीवघेण्या थंडीत आशेचा दीप लावण्याची प्रेरणा देणाऱ्या, झेकोस्लावियाचा दिग्दर्शक व्हॅक्लाव्ह कद्रन्का यांच्या 'सेव्हिंग वन हू इज डेड' चित्रपटाला रौप्य मयूर पुरस्कार मिळाला.

मराठी चित्रपट ‘गोदावरी’ ला दोन आंतरराष्ट्रीय पुरस्कार; निशिकांत कामत यांच्या भूमिकेसाठी अभिनेता जितेंद्र भिकुलाल जोशी यांना सर्वोत्कृष्ट अभिनयाचा रौप्य मयूर पुरस्कार तर दिग्दर्शक निखिल महाजन यांना विशेष ज्युरी रौप्य मयूर पुरस्कार. दिग्दर्शक रॉड्रिगो डी ऑलिव्हेराच्या 'द फर्स्ट फॉलन' मधील भूमिकेसाठी ब्राझिलियन अभिनेत्री रेनाटा कार्व्हालोला आणि निखिल महाजनच्या 'गोदावरी' चित्रपटाला विशेष ज्युरी रौप्य मयूर पुरस्कार, संयुक्तरित्या जाहीर.

गोल्डन पिकॉक पुरस्कार देताना डॉ प्रमोद सावंत
IFFI 2021: स्पर्धा विभागाचा दर्जा घसरतोय!

आपल्या अभिनयाने, सर्व ज्यूरी सदस्यांना खिळवून ठेवणाऱ्या स्पॅनिश अभिनेत्री अँजेला मोलिना हिला शार्लोटच्या भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा रौप्य मयूर पुरस्कार 1984 या वर्षीच्या रशियातील गुंतागुंतीच्या घडामोडी आणि भ्रष्ट समाजाच्या प्रभावी कथनासाठी रशियन दिग्दर्शक रोमन वास्यानोव्हच्या 'द डॉर्म' ला, स्पेशल मेन्शन म्हणजेच’ विशेष उल्लेखनीय पुरस्कार प्राप्त.

गोल्डन पिकॉक पुरस्कार देताना डॉ प्रमोद सावंत
IFFI 2021मध्ये रणवीर, सलमान आणि करणचे हॅंगआऊट

दिग्दर्शक मारी अलेसेंद्रिनीचा ‘झाहोरी’ हा धर्म आणि वसाहतवादावर प्रकाश टाकणारा आणि पॅटागोनियाच्या मूळ स्थानिक लोकांना अत्यंत उमदेपणे सन्मान देणाऱ्या चित्रपटाची, 52 व्या इफ्फीमध्ये पदार्पणातील सर्वोत्कृष्ट पुरस्कारासाठी निवड झाली आहे. स्पॅनिश चित्रपट 'द वेल्थ ऑफ द वर्ल्ड' द्वारे पदार्पण करणारे दिग्दर्शक सायमन फॅरिओल यांना पदार्पणातील स्पर्धा गटात विशेष उल्लेखनीय चित्रपट सन्मान

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com