"राहूल गांधीना पंतप्रधान करण्याची अपेक्षा म्हणजे मोदींना समर्थन"

गोमंन्तक वृत्तसेवा
सोमवार, 24 मे 2021

बॉलिवूडचे प्रसिद्ध लेखक जावेद अख्तर (Javed Akhtar) यांनी केलेल्या ट्विटने सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे. जावेद अख्तर यांनी हे ट्विट कॉंग्रेस नेते सलमान खुर्शीद यांना संबोधित करताना केले असून यात त्यांनी थेट राहुल गांधींवर (Rahul Gandhi)  निशाणा साधला आहे.

नवी दिल्ली : बॉलिवूडचे प्रसिद्ध लेखक जावेद अख्तर (Javed Akhtar) यांनी केलेल्या ट्विटने सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे. जावेद अख्तर यांनी हे ट्विट कॉंग्रेस नेते सलमान खुर्शीद यांना संबोधित करताना केले असून यात त्यांनी थेट राहुल गांधींवर (Rahul Gandhi)  निशाणा साधला आहे. जावेद अख्तर यांनी राहुल गांधी यांना भारताचे पंतप्रधान म्हणून पूर्णपणे नाकारले आहे आणि पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदींना राजकारणात ठेवण्यासाठी आपली बाजूही मांडली आहे. अशाप्रकारे त्याचे ट्विट सोशल मीडियावर बरेच वाचले जात आहे. (Javed Akhtar tweeted and targeted Rahul Gandhi)

37 व्या वर्षी श्रेया बनली आई; बॉलिवूडच्या या अभिनेत्रींना लग्नानंतर अनेक वर्षांनी मातृत्व 

जावेद अख्तर यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे की, "श्रीमान सलमान खुर्शीद तुम्ही राहूल गांधींना लोकशाहीचा राजा संबोधताय ही बाब अत्यांत निंदनिय एक वेळ विरोधी पक्षांतील एक नेता म्हणून राहुल गांधी स्वीकारले जाऊ शकतात, परंतु राहुल गांधींना पंतप्रधान बनविण्याचे स्वप्न पाहणे म्हणजे अप्रत्यक्षपणे मोदींना पंतप्रधान म्हणून कायम ठेवण्याचा प्रयत्न करीत आहे.'

बॉलिवूडच्या चॉकलेट बॉयसोबत सामंथाला करायचाय रोमांन्स 

21 मे रोजी म्हणजेच भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या पुण्यातिथि निमित्त सलमान खुर्शीद यांनी दोन फोटो शेअर केले. हा फोटो दिवंगत राजीव गांधी आणि कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांचा होता. 'एकेकाळी आणि भविष्यातील लोकशाहीचा राजा' असे त्यांनी या या पोस्ट ला कॅप्शन दिले होते. तर जावेद अख्तर यांनी सलमान खुर्शीदच्या त्याच पोस्टला असे ट्विट करून पोस्टद्वारेच प्रत्युत्तर दिले आहे. 

संबंधित बातम्या