जया बच्चन करणार मराठी चित्रपटातून कमबॅक

गोमंतक वृत्तसेवा
गुरुवार, 18 फेब्रुवारी 2021

बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाच्या जोरावर स्व:ताची ओळख निर्माण करणाऱ्या जेष्ठ अभिनेत्री जया बच्चन आता चक्क मराठी चित्रपटामधून कमबॅक करत आहेत.

मुंबई : बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाच्या जोरावर स्व:ताची ओळख निर्माण करणाऱ्या जेष्ठ अभिनेत्री जया बच्चन आता चक्क मराठी चित्रपटामधून कमबॅक करत आहेत. त्यांनी यापूर्वी गुड्डी, कभी खुशी कभी गम, अभिमान, सिलसीला या  चित्रपटांमधून आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला होता. काही काळ रुपेरी पडद्यावरुन विश्रांती घेतल्यानंतर आता त्या पुन्हा चित्रपटात दिसणार आहेत.

बॉलिवूड हंगामाने दिलेल्या वृत्तानुसार,अभिनेत्री जया बच्चन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. आणि विशेष म्हणजे त्या एका मराठी चित्रपटामधून कमबॅक करणार आहेत. दिग्दर्शक गजेंद्र अहिर लवकरच एक मराठी चित्रपट करणार आहेत. या चित्रपटाचे शूटिंग मार्च महिन्यात सुरु होत आसल्याचं समजत आहे. चित्रपटाचे शूटिंग 20 दिवसात होणार आहे. जेष्ठ अभिनेत्री जया बच्चन या चित्रपटामध्ये कोणत्या भूमिकेत दिसणार याची चाहत्यांना उत्सुकता लागली आहे.

ऐश्वर्या - ह्रतिकच्या जोधा अकबरला तेरा वर्ष पूर्ण

मराठीत जया बच्चन यांचा हा पहिलाच चित्रपट आहे. यापूर्वी 2012 मध्ये त्या दिग्दर्शक रितुपर्ण घोष यांच्या 'सनग्लास' या चित्रपटात काम केलं होतं. मात्र काही कारणांमुळे हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येऊ शकला नाही.आता त्या दिर्घ काळानंतर मराठी चित्रपटातून दिसणार आहेत. दिग्दर्शक गजेंद्र अहिर हे आपल्या अनोळख्या चित्रीकरणाच्या शैलीसाठी प्रसिध्द आहेत. आता या आगामी चित्रपटात जया बच्चन कोणत्या भूमिकेत दिसणार याची रसिकप्रेक्षकांसंह अवघ्या चित्रपटसृष्टीला उत्सुकता असणार हे मात्र नक्की!

संबंधित बातम्या